Share Market : शेअर बाजारात ‘स्टॉपलॉस’ हाच किंगमेकर...

  79


  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण


शेअर बाजार हे गुंतवणुकीचे असे क्षेत्र आहे जिथे कित्येक गुंतवणूकदारांनी अत्यंत उत्तम नियोजन करून अतिशय चांगला फायदा मिळविलेला आहे. आपण शेअर बाजारात एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यात वाढ झाली आणि त्यानंतर वाढलेल्या किमतीला जर आपण तो शेअर विकला, तर आपणाला फायदा होत असतो. उलट खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जर कमी किंमतीला शेअर विकला, तर आपणास तोटा होत असतो. शेअर बाजारात या खरेदी आणि विक्रीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तो म्हणजे ‘स्टॉपलॉस’. ‘स्टॉपलॉस’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सरळ भाषेत बोलायचे झाल्यास नुकसान थांबविणे किंवा टेक्निकल भाषेत लॉस बुक करणे असा याचा अर्थ होतो. “स्टॉपलॉस” हा टेक्निकल अॅनालिसिस करून ठरवला जातो. ‘स्टॉपलॉस’ म्हणजे एखाद्या शेअर्सची अशी पातळी की, जर त्या पातळीच्या किंवा किंमतीच्या खाली जर तो शेअर आला तर त्या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते आणि जर त्या पातळच्या खाली आल्यावरआपण केलेल्या त्या गुंतवणुकीत आपले नुकसान आणखी वाढू शकते.


बऱ्याचदा अनेक नावे आणि जुने गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना होत असलेल्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागते. कित्येकदा अनेक गुंतवणूकदार टेक्निकल दृष्ट्या स्टॉपलॉस काय येतोय हे न पाहता आपल्या मनानेच स्टॉपलॉस ठेवतात आणि नुकसान करून घेतात. या उलट चतुर गुंतवणूकदार परिपूर्ण अभ्यास, संयम, योग्य नियोजन आणि स्टॉपलॉसचा योग्य वापर करून शून्यातून आपले विश्व उभे करतात. त्यामुळे माझ्या मते स्टॉपलॉस हा शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असताना खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावतो.


स्टॉपलॉस लावण्याच्या मुख्यत: दोन पद्धती आहेत. एक मी वर सांगितल्याप्रमाणे शेअर खरेदी नंतर किंमत खाली यायला लागल्यावर नुकसान वाढू नये म्हणून लावतात. तर दुसरा असतो तो फायद्याचा स्टॉपलॉस, ज्यामध्ये आपण नफ्यामध्ये आल्यावर तो नफा हातातून जाऊ नये यासाठी तो लावला जातो यालाच टेक्निकल भाषेत ‘ट्रेलिंग स्टॉपलॉस’ असे म्हणतात. निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीची १९३०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या पातळी खाली निर्देशांक आल्यास निर्देशांकात आणखी घसरण होऊ शकेल. पुढील काळाचा विचार करता क्विक हिल, उज्जीवन बँक, गोदरेज इंडस्ट्रीज यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीची आहे. मी माझ्या १७ जुलै २०२३ च्या लेखात ‘झोमॅटो’ या शेअरने ८० ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत, हे सांगितलेले होते. त्यामुळे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून ८२.५० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी तेजीचा व्यवहार केल्यास हा शेअर १०० ते ११० रुपये किमतीपर्यंत वाढ दाखविणे अपेक्षित आहे, हे १ सांगितलेले होते. मी सांगितल्यानंतर या आठवड्यात या शेअरने १०७.७० हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये ३० टक्क्यांची महावाढ अडीच महिन्यांत झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसारल सोने या मौल्यवान धातूची गती आणि दिशा ही मंदीची असून जोपर्यंत सोने ५८५०० या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत सोन्यामधील मंदी कायम राहील.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)


samrajyainvestments@gmail.com



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रुपयांत उपलब्ध

मुंबई : किया इंडिया कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९

RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी

टाटा मोटर्सची ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा

तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात

शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला.

चीनला फटका, भारतीय निर्यातीचा झटका

महेश देशपांडे जगातील दोन सर्वात दोन मोठे देश असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने