Nobel Prize in Economics 2023 : क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

मुंबई : वर्षभरात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी (Nobel Prizes) गौरविण्यात येतं. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला नोबेल पुरस्कार प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्याची घोषणा करून नोबेल पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. तर आज अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२३ च्या (Nobel Prize in Economics 2023) विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. क्लॉडिया गोल्डिन (Claudia Goldin) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने (Royal Swedish Academy of Sciences) त्यांची निवड केली आहे.


गोल्डीन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. सध्या त्या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून, गोल्डिन यांनी केलेल्या संशोधनामध्ये महिलांची श्रम शक्ती, कमाईतील लिंग अंतर, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह विविध विषयांच्या अभ्यासाचा समावेश आहे. त्यांनी केलेले बरचसे संशोधन हे भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तनमानाचा अर्थ लावते. त्यांनी रिअर अँड फॅमिली, अ सेंच्युरी ऑफ वुमन - द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी ही पुस्तके लिहिली आहेत.


अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डीन ओळखल्या जातात. त्यांना विशेषतः श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी आज अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. नोबेल समितीने म्हटले की, गोल्डीन यांच्या संशोधनातून अर्थव्यवस्थेतील लैंगिक अंतराबाबत माहिती मिळते. नोबेल समितीने पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितले की, गोल्डीन यांच्या संशोधनाने महिलांचे उत्पन्न आणि श्रमिक बाजारातील इतिहासाचा परिणाम यांचा सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला आहे.



बक्षीस म्हणून नऊ लाख सात हजार डॉलर्स मिळणार


गोल्डिन यांना अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ २०२३ चा अर्थशास्त्रातील Sveriges Riksbank पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कार विजेत्याला १० दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे नऊ लाख सात हजार डॉलर्स दिले जातात. गेल्या वर्षीचा पुरस्कार यूएसस्थित अर्थशास्त्रज्ञ बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना त्यांच्या बँका आणि आर्थिक संकटांवरील कार्यासाठी देण्यात आला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक