Nitesh Rane : संजय राऊतची ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नाही

Share

शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की…

आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडे बोल

मुंबई : उबाठाचे (Ubatha) मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येते. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणार्‍या महायुती (Mahayuti) सरकारबद्दल असं छापून आणणार्‍या सामनाच्या संपादकांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडसावले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नितेश राणे यांनी त्यांचीच लायकी दाखवून दिली.

नितेश राणे म्हणाले, सामना वर्तमानपत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची कॅपेसिटी आणि लायकी यावर लिहिलेलं आहे. पण खरं तर रश्मी ठाकरेंना सामनाचे संपादक बनवून, संजय राजाराम राऊतची लायकी काढली, असं आम्ही म्हणायचं का? ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होता. शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण याच्या लायकी प्रमाणे २ ते ३ पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत, हीच याची लायकी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

राजाराम राऊत यांच्या मुलाला म्हणजे संजयचा बंधू सुनिल राऊत याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी ओळखली आणि म्हणून मविआ सरकारच्या मंत्रिमंडळात संजयने एवढा थयथयाट करुनही सुनिलला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही. पण राजाराम राऊत यांच्या कुटुंबियांमध्ये कॅपेसिटी आहे, हे मानलं पाहिजे. ती कॅपेसिटी आहे गरिबांची खिचडी चोरण्यात. कारण अख्ख्या कुटुंबांचं नाव खिचडी घोटाळ्यात आलं आहे. त्यामुळे तुझी आणि तुझ्या मालकाची आधी लायकी, कॅपेसिटी बघ आणि मग फडणवीस साहेबांबद्दल बोल, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.

शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की…

आमचा मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांना मी सांगेन की तुम्ही शिंदेसाहेबांना त्रास देणार याला काही मर्यादा आहेत. कधी अॅडच्या निमित्ताने तर कधी काही वक्तव्यं करुन त्यांना त्रास देता आणि मग शिंदेसाहेबांना स्पष्टीकरण द्यावं लागतं. म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी काय करावं, कुठे काम करावं हे बोलण्याइतके आपण मोठे नाही आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांचं काम व्यवस्थितरित्या करु द्यात. उगाच काहीतरी बडबडून संजय राऊतसारख्या लायकी नसलेल्या माणसाला फुलटॉस देऊ नका, हा सल्ला नितेश राणे यांनी मित्रपक्षाच्या सहकार्‍यांना दिला.

उबाठा सेनेच्या कोर्टातील याचिका आधी मागे घ्या…

आज सकाळी त्यांनी हाही उल्लेख केला की आज पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील, तशा महापालिकेच्या निवडणुकाही आयोगाने जाहीर कराव्यात. पण त्यासाठी तुमच्यासारख्या अनाडी माणसाला मी सांगेन की कोर्टामध्ये उबाठा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत, त्या आधी मागे घ्या. मग महापालिकेच्या निवडणुका आयोग लगेच लावेल.

…अशा निवडणुका जिंकता येत नाहीत

रायगडमधून ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा केला आहे याबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, की त्यांनी कितीही उमेदवारी जाहीर केल्या तरी तिथे आमच्या महायुतीचाच खासदार निवडून येणार, स्वतःच निवडणुका जाहीर करुन, उमेदवारी जाहीर करुन निवडणुका जिंकता येत नाहीत, एवढंच मी सांगेन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

31 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago