Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पर्वणीचे दिवस

Share
  • अर्थभूमी : उमेश कुलकर्णी

अर्थव्यवस्थेसाठी सध्याचे दिवस मरगळलेले आहेत आणि ब्रँड उत्पादनांसाठी, तर उदासपर्वच आहे. पण आता अभूतपूर्व पर्वणी अर्थव्यवस्थेसाठी येणार असून सणासुदीचा हंगाम आणि त्याच्या जोडीला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असा दुहेरी संगम होत आहे. हा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ब्रँड उत्पादनांच्या पुनरज्जीवनासाठी अनुकूल काळ असून अर्थव्यवस्थेला जोरदार रेटा मिळणार आहे. यालाच ‘आर्थिक बूम’ असे म्हणतात. क्रिकेट विश्वचषक आणि सणासुदीचे दिवस यामुळे उपभोगाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढणार असून यातून हॉटेल उद्योग, विमान वाहतूक, या क्षेत्रांना चांगलेच दिवस येणार आहेत, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

तसे तर सणासुदीचे दिवस दरवर्षीच येत असतात. पण यंदा सणाच्या जोडीला आहे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि भारतात तर विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रचंड प्रमाणात खरेदी होते. अगदी प्राथमिक स्वरूपात सांगायचे, तर टीव्ही सेट्स, क्रिकेटपटू ज्या उत्पादनांची जाहिरात करतात ती ब्रँडची उत्पादने आणि कपडे, इतर अपारेल्स वगैरेची खरेदी या काळात तुफानी होते. सामने पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात क्रिकेट रसिक जात असल्याने पाहुणेही लाखोंच्या संख्येने भारतात येणार आहेत. त्यामुळे अर्थात विमान वाहतूक क्षेत्र जोरात असेल. उपभोगाच्या प्रमाणाचे चित्र गेल्या काही दिवसांत पाहिले, तर त्यात उत्साहाचा लवलेश नव्हता. पण आता त्यात उत्साह भरला आहे आणि जवळपास ५ लाख परदेशातील क्रिकेट चाहते भारतात सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्या प्रमाणात विमान व वाहतूक क्षेत्राला व्यवसाय मिळणार आहे. झोमॅटो या खाद्यपदार्थ वितरणासाठी असलेल्या कंपनीने आशावाद जास्तच व्यक्त केला असून त्यांचे समभाग ५२ आठवड्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत आणि अजून खऱ्या अर्थाने क्रिकेट विश्वचषक सुरूच झालेला नाही. इतरही अनेक क्षेत्रे चालना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपभोगाचे प्रमाण जसे वाढेल, तसे भारतीय अर्थव्यवस्था झेप घेईल आणि विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्था १३,५०० कोटी रुपयांनी झेप घेईल. जागतिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेला हा प्रचंड दिलासा असेल. १९८७ नंतर प्रथमच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या बरोबरीने सणासुदीचा हंगाम एकत्र आले आहेत. एका भाकितानुसार, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री यंदा ७०,००० कोटी रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, विमान वाहतूक या क्षेत्रांना या दिवसांत जोरदार रेटा मिळणार असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा पुश मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धेमुळे उपभोगाच्या प्रमाणात पुन्हा भारतीय ग्राहकांना स्वारस्य वाटत असून उपभोगाचे प्रमाण आकाशात भरारी घेईल, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करतात. आता कोविडचा प्रभाव ओसरला असून त्याचे परिणामही आता हळूहळू नष्ट होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रिमियम खरेदी करण्यात स्वारस्य वाढत असून खर्च विविध क्षेत्रांत विभागला जात आहे. यात फॅशन, मनोरंजन, वैयक्तिक काळजी आणि फावला वेळ घालवण्याचे उद्योग यात लोकांना खरेदी करण्यात जास्त स्वारस्य वाढल्याचे दिसते. ग्राहकोपयोगी वस्तुंत मोठी खरेदी होण्याची शक्यता असल्याने विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला दहा बीपीएस इतकी भर पडण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.

ब्रँड उत्पादनांना आपले प्रदर्शन करून ग्राहकांना आपल्याकडे खेचून विक्री वाढवण्याची ही सोनेरी संधी आली आहे. उद्योगातील सूत्रांच्या मते, यावेळी डिस्ने स्टार या डिजिटल आणि टीव्ही मंचाला ८० कोटी लोकांचा प्रेक्षक वर्ग लाभेल आणि त्या प्रमाणात त्यांचा महसूल वाढेल. हा आकडा कितीतरी कोट्यवधी रुपयांत जाईल. विश्वचषक स्पर्धा ही अशी आहे की, त्यात ग्राहकांच्या भावनंवर मोठा परिणाम
करत असते.

भारतात तर क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती या फार मोठा परिणाम ग्राहकांवर करतात आणि कित्येकदा जाहिराती प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सध्या भारतीय ग्राहक अॅपल फोनसाठी धावत आहेत, तर २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकर याची होनोलुलू येथील दौऱ्यासाठी केलेली जाहिरात ही देशातील सर्वात लोकप्रिय जाहिरात ठरली होती.

कंपन्या अत्यंत हुषारीने आपल्या उत्पादनाना स्पर्धेशी जोडून घेतात. ग्राहकांना नावीन्यपूर्ण जाहिरातींनी चाहत्याना ओढून घेतात. कोला कंपनीने आपल्या बाटल्यांच्या बुचात स्क्रॅच कार्ड टाकून बक्षीसे देण्याची योजना जाहीर केली होती. ती बक्षीसे कुणाला लागली, ते कळलेच नाही. पण कोला कंपनीचे उत्पादन प्रचंड खपले. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय ग्राहकांच्या भावनांमध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे. त्यामुळे कितीतरी ब्रॅंड आज यात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत आणि टीव्ही आणि डिजिटल माध्यमांची प्रचंड प्रेक्षकांची संख्या पाहता, डिस्ने स्टारची चांदी होणार आहे. भारतीय ग्राहकांची भावना बदलण्यात यंदाचा विश्वचषक हा एक उपमान ठरणार आहे.

या विश्वचषकाने कायमस्वरूपी स्मृती रहाणार आहेत आणि त्यात एका सामन्याला उपस्थित असलेला प्रेक्षकवर्गही अनेक दशके त्या सामन्याला लक्षात ठेवण्याची शक्यता आहे. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. या विश्वचषकाच्या आकडेवारीविषयी पाहिले असता असे दिसते की, सहा आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीला आयोजनातून १२० ते १५० दशलक्ष डॉलर्स इतका महसूल मिळणार आहे. २० प्रायोजक असून तितकेच भागीदार आहेत. सहा जागतिक भागीदार असून ६ ते ८ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम ते मोजणार आहेत. डिस्ने स्टार हे अधिकृत सामने दाखवणारे माध्यम असून टीव्ही आणि डिजिटल दोन्ही माध्यमांवर त्याच्याकडेच सामने दाखवण्याची जबाबादारी आहे. मोठ्या उद्योगसमूहांना अशा स्पर्धा प्रायोजित करण्याचा मोह आवरत नाही कारण, त्या सामन्यांना असलेल्या प्रेक्षक वर्गाची संख्या त्यांच्या तोंडाला पाणी आणणारी असते. आता विश्वचषक सामने सुरू झाले की, त्यांना प्रायोजित करणाऱ्या उत्पादनांची विक्री हातोहात वाढते, असे कित्येकदा लक्षात आले आहे. अर्थव्यवस्थेवर या विश्वचषकाचा परिणाम जोरदार होणार आहे, कारण मरगळलेली अर्थव्यवस्था आता तजेलदार होऊन पुढे येणार आहे.

एका बँकेच्या अंदाजानुसार, यंदा विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्था २.४ अब्ज कोटी रुपयांनी म्हणजे वीस हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे. प्रचंड संख्येने चाहते सामने पाहण्यास येणार आहेत आणि त्याचा लाभ प्रायोजित कंपन्या आणि डिस्ने स्टारला होणार आहे. संघ सामन्यांच्या ठिकाणी प्रवास करणार असल्याने पाहुणचार आणि पर्यटन या उद्योगांना भरभराटीचे दिवस दिसणार आहेत. त्याचा लाभ अर्थातच अर्थव्यवस्थेला होणार आहे. २०११ नंतर प्रथमच ही स्पर्धा भारतात होत आहे. खरेदीचे प्रमाण वाढणार तर आहेच. पण तज्ज्ञांच्या मते प्रेक्षकसंख्या ५५२ दशलक्ष इतकी जाण्याची शक्यता आहे आणि टीव्ही प्रक्षेपणाच्या हक्काद्वारे १२ हजार कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

आता या गोडगुलाबी चित्राची एक नकारात्मक बाजूही आहे. या बूममुळे महागाईही वाढणार आहे. विमानाची तिकिटे, हॉटेलमध्ये रहाण्याची बिले आणि यांच्या दरात प्रचंड वाढ नोंदवली जाणार आहे. दहा शहरांत सामने होणार असून तेथे सेवा शुल्क मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान महागाईचा दर ०.१५ ते ०.२५ टक्के इतका वाढणार आहे. मात्र तिकीटांची विक्री, हॉटेलमध्य़े वास्तव्य, मालाची विक्री आदीद्वारे कर संकलनातून सरकारची तिजोरीही भरून वाहणार आहे. एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्वणी आली आहे.

umesh.wodehouse@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

13 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

45 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago