Bus Accident: नैनीतालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

  216

डेहराडून: उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये(nainital accident) भीषण अपघात झाला आहे. ३२ प्रवाशांनी भरलेली बस कालाढुंगी रोडवरील नालनीमध्ये दरीत बस कोसळली. बसमधील प्रवासी हे हरियाणा येथून नैनीतालमध्ये फिरण्यासाठी आले होते. १८ लोकांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.



बसमधील ३२ लोक हिसार येथून नैनीतालला आले होते


घटनास्थळी पोहोचून संघाला माहिती मिळाली की बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास करत होते. ते हिसार येथून नैनीतालला पोहोचले होते. एसडीआरएफच्या रेस्क्यू टीमने पोलिसांसोबतच्या संयुक्त रेस्क्यू अभियान सुरू केले आणि बसमधील १८ लोकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. इतर प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.



ऑगस्टमध्ये गंगनानी येथे झाला होता भीषण अपघात


याआधी ऑगस्टमध्ये उत्तराखंडमध्ये गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातच्या प्रवाशांची बस गंगोत्री राष्ट्रीय राजमार्गाच्या के गंगनानी जवळ दरीत बस कोसळली होती. या बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या बस अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.


अपघातानंतर पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशीने सांगितले होते की २७ लोकांना रेस्क्यू करण्यात आले. यात लोकांना छोटी-मोठी दुखापत झाली. मात्र सगळे सुरक्षित होते. ७ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.