Accident: भोरच्या वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस, चालकाचा मृत्यू

पुणे: पुण्यातील भोरच्या वरंधा घाटात शनिवारी एका मिनी बसला मोठा अपघात(accident) झाला. स्वारगेट येथून भोरमार्गाने महाड-चिपळूणकडे जाणारी एक मिनी बस वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघाताता चालकाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले.


शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या स्वारगेट येथून भोरमार्गे महाड-चिपळूणच्या दिशेने ही बस जात होती. त्यावेळेस वरंधा घाटात ही बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला असलेल्या ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.


या घाटात रस्त्यांना संरक्षण कडे नाहीत. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, ही बस धरणाच्या पाण्यापासून ५ फुटांवर अडकली. नाहीतर मोठा अनर्थच घडला असता.


या अपघातात अजिंक्य कोलते हा चालक जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर गाडीतील इतर सर्व प्रवासी सुखरूप आहे. काही जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai-Pune : रेल्वे ठप्प, एसटीचा दिलासादायक निर्णय! मुंबई-पुणे मार्गावर २०० अतिरिक्त बसफेऱ्यांची घोषणा

पुणे : लोणावळा-कर्जत घाट विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटना अपडेट; अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनला वेग

पुणे : मोशी (Moshi) कचरा डेपो (Garbage Depot) येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीजवळील मलबा (Debris) हटवून इमारतीत प्रवेश करण्यासाठी

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन

पुणे : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर (Temple)

Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :