Moshi Building Collapse : मोशी दुर्घटना अपडेट; अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनला वेग

पुणे : मोशी (Moshi) कचरा डेपो (Garbage Depot) येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीजवळील मलबा (Debris) हटवून इमारतीत प्रवेश करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विविध यंत्रसामग्रीच्या (Machinery) मदतीने हे काम वेगाने सुरू असून, इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF - National Disaster Response Force) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.


सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम सुरू असून, बाजूचा मलबा हटवण्यासाठी जेसीबी (JCB), पोकलेन (Poclain) आणि डंपर (Dumper) यांचा वापर केला जात आहे. अडकलेल्या नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी बचावकार्य (Rescue Operation) अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे.


महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त (Police Commissioner) विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट (Commandant) प्रवीण धट्ट यांनी घटनास्थळी भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेऊन पुढील बचावकार्याची रणनीती (Strategy) निश्चित करण्यात आली.



आयुक्तांचे सर्व यंत्रणांना निर्देश


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पाहणी करून बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री (Equipment) आणि मशिनरी (Machinery) कार्यरत असल्याचे सांगितले. दुर्घटनेला भरपूर तास उलटल्यानंतरही प्रशासन अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यामुळे आता मागील बाजूने सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आत अडकलेल्या व्यक्तींचे संभाव्य स्थान निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली.



मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा


मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मोशी दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच बचावकार्य लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोशी येथील लेगसी वेस्ट (Legacy Waste) बायोमायनिंग (Biomining) प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश दिले. तसेच दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार