Satara riots : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीतील दंगलीचा पोलिसांनी केलेला तपास चुकीचा दिशेने : मानवाधिकार परिषद

Share

मानवाधिकार परिषदेकडून फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट बनवून गृहमंत्र्यांना सुपूर्द

अन्यायग्रस्त हिंदू बांधवांना भरपाई देण्याचीही मागणी

सातारा : सातारा दंगलीच्या (Satara Riots) घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन झाले असून त्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ मधील तरतुदींनुसार योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषद संचालक विपिन मेनन यांनी राज्य शासनाकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे काही आक्षेपार्ह घटना घडल्या. यात हिंदू देवी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. एका मुस्लिम समुदायाच्या सदस्याचा दंगलीत मृत्यू झाला होता. पुसेसावळी गावातील मशिदीवर हल्ल्यात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. सदर घटनांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे सहा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने महाराष्ट्र हादरला होता.

पुसेसावळी गावातील आणि सातारा शहरातील घटनांचा संबंध नसला तरी या दोन्ही घटनांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक ठरले. कारण या दोन्ही गावातील घटनांतला एक समान धागा म्हणजे हिंदू देवदेवता, भारत माता आणि छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे. सोशल मीडिया मेसेजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाइल कोड ००९२ हा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानात नोंदणी केलेल्या मोबाईलवरून सातारा शहरातील हिंदूंना धमकीचे संदेश येत असल्याची बाब गंभीर आहे. यात समाजकंटकांचा सहभाग तर आहेच, पण सीमापार संपर्काचे गांभीर्यही लक्षात घ्यावे लागेल. भारतीय मानवाधिकार परिषद ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत परवानाकृत संस्था आहे. परिषदेची मुख्य उद्दिष्टे मानवाधिकार क्षेत्रात मदत करणे, प्रशिक्षण देणे, प्रोत्साहन देणे, संरक्षण करणे आणि हस्तक्षेप करणे असे आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.

पुसेसावळी व सातारा शहरातील रहिवाशांनी भारतीय मानवाधिकार परिषदेकडे याप्रकरणी लक्ष घालून वस्तुस्थितीच्या आधारे न्याय द्यावा असे आवाहन केले. त्यामुळे अशा परिस्थितीत अफवा आणि असंबद्ध आरोपांतून तथ्य शोधणे व त्या ठिकाणी घडलेल्या घटनांचे खरे चित्र देणे आवश्यक झाले. याशिवाय, हिंदू समाजाला अश्लील व अपशब्द आणि प्रक्षोभक टिप्पणींबद्दल संताप वाटत असतानाच पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे ते अस्वस्थ आहेत. हिंदू देवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्या मूळे हिंदू समाज खूप दुखावला गेला आहे.

या घटनांचा स्थानिक लोकांवर होणारा परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय मानवाधिकार परिषदेने या समस्येत हस्तक्षेप करण्याचे ठरवले. घडणाऱ्या घटनांची साखळी, घटनांचे मूळ आणि त्यामागील कारणे शोधण्यासाठी एक सत्य शोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावर सर्वसमावेशक सत्य शोध अहवाल सादर करून या घटनांचे निरनिराळे स्वरूप, पुसेसावळी व सातारा शहरात त्या काळात काय घडले. याचे खरे चित्र मांडण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली. त्यानुसार परिषदेच्या सत्य शोधन समितीने आपला अहवाल सादर केला आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

समितीची निरीक्षणे आणि शिफारशी

पुसेसावळी व सातारा शहरातील रहिवाशांनी भारतीय मानवाधिकार परिषदेकडे या प्रकरणी लक्ष घालून वस्तुस्थितीच्या आधारे न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. अफवा आणि संबंध नसलेल्या आरोपांमधून तथ्य शोधणे. त्या ठिकाणी घडलेल्या घटनांचे खरे चित्र देणे आवश्यक झाले. याशिवाय, हिंदू समाजाला अश्लिल अपशब्द आणि प्रक्षोभक टिप्पण्यांबद्दल संताप वाटत असतानाच, पोलिस अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे ते अस्वस्थ आहेत, यामुळे हिंदू समाज खूप दुखावला गेला आहे.

या गुन्ह्यांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र आणि संतापजनक होती. परिणामी, साताऱ्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या प्रतिनिधीने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरमान राजासाब शेख यांना कथितपणे पाठिंबा देणाऱ्या फिरोज हबीब खान पठाण यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे फडतरे यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले.

सातारा शहरातील गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तीन दिवसांनी म्हणजे १८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू देवतांबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्राम वर व्हायरल झाली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, “mr_adil_xx “च्या खात्यातून पोस्ट पाठवण्यात आली होती. ही बाब प्रथम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात पसरली. समाजातील विविध स्तरातून त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शहरातील हिंदू समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता.

प. कौन्सिलने केलेल्या चौकशीत असे दिसून आले की “आलमगीर औरंगजेब बादशाह” या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. जो सशुल्क गट आहे. ज्यामध्ये सुमारे १०८ सदस्य आहेत. ज्यात ६ ते ७ पाकिस्तानी नंबर आहेत (+९२) या ग्रुपद्वारे नवीन संदेश तयार आणि प्रसारित केले जातात. गटातील पाकिस्तानी सहकार्याचे स्पष्ट संकेत धोकादायक आहेत. ज्याची सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या संमतीने चौकशी होणे अपेक्षित आहे. पोलिसांनी याला स्थानिकांचा हातखंडा असल्याचे म्हटले आहे. पण पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडलशी चिमटा काढण्यासाठी स्थानिक लोकांकडे तंत्रज्ञानाचा आधार असेल का? याबद्दल शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी हा संवेदनशील विषय व्यावसायिक पद्धतीने हाताळला नाही. +९२ सह मोबाईल क्रमांकाने दर्शविल्यानुसार स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या उपस्थितीची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली

१० सप्टेंबर २०२३ रोजी पुसेसावळी येथील दोन मुस्लिम तरुणांनी अल्तमश अस्लम बागवान आणि मुजम्मिल ताजुद्दीन बागवान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट श्रीराम रत्नपारखी यांच्या निदर्शनास आल्याने किरण नामदेव हिरवे पोलीस हवालदार बिल्ला क्रमांक ५१० यांच्या निदर्शनास आणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. श्री. केंद्रे यांनी ती चौकशीसाठी घेतली. दोन्ही आरोपींना एकाच दिवशी म्हणजे १० सप्टेंबर २०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे दंगल झाली. एक मुस्लिम व्यक्ती मृत पावला, दहा जखमी झाले. अनेक वाहने जाळली गेली. काही दुकानेही जाळण्यात आली.

या संदर्भात औंध पोलीस ठाण्यात क्र.२५५/२०२३ व २५६/२०२३ नुसार तक्रार नोंदविण्यात आली. सुरुवातीला २३ जणांना अटक करण्यात आली. नंतर ही संख्या २५ ते ३६ वर गेली. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत आणि पोलिसांनी वापरलेल्या पद्धतींबाबत हिंदू समाजात प्रचंड असंतोष आहे. पोलीस बिनधास्त निर्दोष व्यक्तींना अटक करत आहेत. दंगलीशी संबंध नसलेल्या व्यक्तींनाही आरोपी म्हणून घेतले जात आहे. १८ ऑगस्ट २०२३ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात निषेध मोर्चे काढणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बोलावण्यास सुरुवात केली.

या गुन्ह्यात सहभागी नसलेल्यांना अटक करण्यात येत असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. या अर्थाने पोलीस हिंदू समाजातील व्यक्तींना सापत्न वागणूक देत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. कौन्सिलकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी चिन्मय शिंदे ह्या प्रकरणात क्र. २३९/२०२३ मधील फिर्यादी आहे. तो तक्रारदार असल्याच्या कारणावरुन गुन्ह्यात आरोपी करण्यात आला आहे, तरीही त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही असे सांगण्यात आले.

तसेच प्रकरण क्रमांक २५४/२०२३ मधील महत्त्वाचा साक्षीदार श्रीराम रत्नपारखी ज्याने पोलीस हवालदार किरण निकम यांना व्हायरल झालेल्या मेसेजच्या आधारे गुन्हा नोंदवला होता. त्याची माहिती आरोपी म्हणून ओळखण्यात आली आहे. तर तोसुद्धा या प्रकरणात सहभागी नसल्याचे निदर्शनास आले. १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू देव देवतांच्या, भारत मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकून हिंदू-मुस्लिम धर्मांत तेढ निर्माण करून दंगल घडू शकते. ही बाब महिती असून ऑगस्ट २०२३ मध्ये सातारा जिल्ह्यात दोन गुन्हे नोंद असून देखील जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक सातारा हे सप्टेंबर २०२३ मध्ये दंगल घडण्यास प्रतिबंध करण्यात अयशस्वी झाले.

सर्व सहा गुन्ह्यांचा व त्या बाबत प्राप्त निवेदानांचा व तक्रार अर्जांचा तपास केंद्रीय तपास यंत्रणे कडे देण्यात यावा. “आलमागीर औरंगजेब बादशहा ” या ग्रुप मध्ये ५-७ पाकिस्तानी सदस्य आहेत. गुन्हा राजी क्र.०६६७/२०२३ चे फिर्यादी व साक्षीदार यांना धमकीचे संदेश मूळ पाकिस्तानात नोंद असलेल्या +९२२३२९३०००३२९ या मोबाईल वरुन आल्याने या गुन्ह्यात प्रथम दर्शनी पाकिस्तान संपर्क व संबंध निष्पन्न होत असल्याने या बाबतचा तपास एनआयए (NIA) कडे सोपविण्याची शिफारस आहे.

या सर्व प्रकरणात फिरोज हाबईबखान पठाण व सूर्यकांत सुरेश शंकर कदम यांचा सहभाग तपासण्यात यावा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणीही निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

17 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

17 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

18 hours ago

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

18 hours ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

18 hours ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

19 hours ago