मुंबई : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यातच हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रोखठोक भूमिका घेतली असता सुषमा अंधारेंनी राज ठाकरे यांच्या नातवाला मध्ये ओढलं. ‘घरासमोरुन मिरवणूक जात असताना नातवाला त्रास होतोय म्हणून एक बडा नेता भाष्य करतो’, असं राज ठाकरेंविषयी त्यांनी नाव न घेता वक्तव्य केलं. यावर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी अंधारेबाईंना चांगलाच दणका दिला आहे. ‘राजसाहेबांच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डी.जे. वाजवू’, अशा विषयाचं पत्र लिहित शालिनीताईंनी अंधारेबाईंचा समाचार घेतला आहे.
शालिनीताईंनी आपल्या पत्रात लिहिले आहे, ‘प्रिय अंधारे बाई, हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचं दिसतंय. सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात’, अशी जळजळीत टीका शालिनीताईंनी केली आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे, कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या ‘गट’ प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या ‘गट’ प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते, मग तुमच्या सारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही खडे बोल सुनावले आहेत.
शिल्लक सेना प्रमुख आज काल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आपण नैराश्येत आहात. त्यातूनच संबंध नसताना आपण राजसाहेबांच्या नातवाला या राजकारणात ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. या बाबत आपण खरंतर जाहीर माफी मागितली पाहिजे. पण आमच्या देव देवतांचा, आमच्या संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही, त्यामुळे आम्ही आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे, असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.
आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का ? अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा, असा खोचक सल्ला शालिनीताईंनी दिला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…