पंढरपूर : कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होते. मात्र आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हा महापूजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की अजित पवार (Ajit Pawar) करणार असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे आता हा गुंता सोडवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेणार आहे.
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदा येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्याच्या तयारीसाठी मंदिर समितीची बैठक झाली. त्यात हा मान दोनपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा यावर चर्चा करण्यात आली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
गतवर्षी कातिर्की एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. पण आता बदलत्या घटनाक्रमांतर्गत राज्याला अजित पवार हे आणखी एक उपमुख्यमंत्री लाभलेत. त्यामुळे मंदिर समितीपुढे कार्तिकी एकादशीच्या यंदाच्या पूजेला कोणत्या उपमुख्यमंत्र्याला बोलवायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकाला बोलावले तर दुसरा नाराज होण्याची भीती आहे.
मंदिर समितीला पवार व फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे आहेत. त्यामुळे विधी व न्याय विभाग सूचना करेल त्या उपमुख्यमंत्रायाला कार्तिकी महापूजेचे निमंत्रण दिले जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्यामुळे आता हे निमंत्रण कुणाला मिळणार हे विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…