Share Market : शेअर बाजार, गुंतवणुकीचा उत्तम पर्याय…

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

‘गुंतवणूक’ या शब्दाची व्याप्ती हीच मुळात खूप मोठी आहे. आपल्यापैकी गुंतवणूक करीत नाहीत असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या अगदीच नाममात्र आहे. आपण मिळवीत असलेल्या पैशांतून आपण बचत करून त्यातून आपला पैसा वाढावा यासाठी आपण गुंतवणूक करीत असतो.

सध्या जगात बँकेमधील ठेवी, जमीन खरेदी, सोने-चांदी यामधील खरेदी, पीपीएफ यामध्ये आपली गुंतवणूक असते. आज आपण बचत करीत असलेल्या पैशावर मिळणारा परतावा आणि वाढणारा महागाईचा दर यामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजपर्यंत गेली अनेक वर्षे सातत्याने चांगला परतावा देत असलेले क्षेत्र म्हणजे भारतीय शेअर बाजार. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर तो गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून त्याचा विचार करणे आवश्यक आहे.

शेअर बाजारामध्ये बीएसई आणि एनएसई ही दोन एक्स्चेंज असून त्यांनी तयार केलेल्या शेअर्सच्या समूहालाच आपण अनुक्रमे ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ असे म्हणतो. ह्यांनाच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक म्हणतात. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ यांची दिशा कोणती आहे यावरून शेअर बाजाराची दिशा कोणती आहे याचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे या निर्देशांकाचा अभ्यास करून त्यावरून कल अर्थात दिशा काय आहे हे बघूनच गुंतवणूक करणे आवश्यक असते. गुंतवणूक करीत असताना नियोजन संयम आणि गुंतवणुकीचा कालावधी ठरविणे अत्यंत आवश्यक असते. आपण कंपनीचा अभ्यास दोन प्रकारे करू शकतो. त्यालाच कंपनीचे ‘टेक्निकल अॅनालिसिस’ आणि ‘फंडामेंटल अॅनालिसिस’ असे म्हणतात. आपण गुंतवणूक करीत असलेल्या कंपनीचा पीई रेशो, त्यांची मालमत्ता, त्यांच्यावर असलेली कर्जे, कंपनी लाभांश देते का? आणि इतर काही गुणोत्तर हे सर्व ‘फंडामेंटल अॅनालिसिस’मध्ये येते. ‘टेक्निकल अॅनालिसिस’मध्ये कंपनीच्या किमतीत आजपर्यंत झालेल्या हालचालीवरून पुढील किमतीचा अंदाज बांधला जातो. निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीची १९५०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या पातळी खाली निर्देशांक आल्यास निर्देशांकात आणखी घसरण होऊ शकेल. पुढील काळाचा विचार करता हडको, आरव्हीएनएल, आयआरएफसी यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची आहे. मी माझ्या ११ सप्टेंबर २०२३च्या लेखात ‘एमसीएक्स’ या शेअरमध्ये मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून आज १८०७ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये १५७९ रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस लावून तेजीचा व्यवहार केल्यास मध्यम मुदतीत चांगला फायदा होऊ शकेल हे सांगितलेले होते. मी सांगितल्यानंतर केवळ २ आठवड्यात या शेअरने २१३८ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये १८ टक्क्यांची महावाढ १५ दिवसांत झालेली आहे.

कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची गती ही तेजीची असून दिशा रेंज बाउंड आहे. जोपर्यंत सोने ५८५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. मात्र रेंज बाउंड स्थितीमुळे सोन्यामध्ये होणारी वाढ ही देखील मर्यादित असेल. ज्यावेळी सोने ६०००० ही पातळी ओलांडेल त्याचवेळी सोन्यामध्ये मोठी वाढ होईल. दोन आठवड्यांपासूनच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. या आठवड्यात देखील ही वाढ कायम राहिली.

पुढील काळात जोपर्यंत कच्चे तेल ७००० रुपये किमतीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील. ७४०० ही आता कच्च्या तेलाची अत्यंत महत्त्वाची विक्री पातळी असून या पातळीपासून कच्चा तेलात करेक्शन येणे अपेक्षित आहे. मात्र आता जोपर्यंत कच्चे तेल दिशा बदलत नाही तोपर्यंत कच्च्या तेलात विक्री करणे टाळायला हवे.

(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

7 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

7 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

7 hours ago

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

10 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

10 hours ago

Hathras stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२२ लोकांचा मृत्यू

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…

11 hours ago