Nitesh Rane : संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांना चौकात उभं करुन चपलेने मारलं पाहिजे

आदित्यच्या म्याँव म्याँवची डरकाळी होत नाही


नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : आज सकाळी ईडीच्या चार्जशिटमध्ये सुजित पाटकरने दिलेली जी माहिती आहे, ती अतिशय संतापजनक आहे. कोविडच्या काळात ज्यांच्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांचे मृत्यू झाले, त्या प्रत्येकाने पाटकरचं हे वक्तव्य बारकाईने ऐकावं. कोविड काळात मिळणारे टेंडर, कॉन्ट्रॅक्ट्स यासाठी मी संजय राजाराम राऊतचं नाव वापरायचो, असं त्याने म्हटलं. याचा थेट अर्थ असा होतो की कोविड काळात झालेला भ्रष्टाचार, हलगर्जीपणा यांमुळे ज्यांना आपले नातेवाईक गमवावे लागले त्या सर्वांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांना चौकात उभं करुन चपलेने मारलं पाहिजे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी या तिघांचा चांगलाच समाचार घेतला.


नितेश राणे म्हणाले, यासंदर्भात आज सकाळच्या प्रेसमध्ये संजय राऊतांना आमच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला पण त्यांनी पत्रकारांना दम देताना मी पाहिलेलं आहे. जर हिंमत असेल तर तू त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर पुढच्या पत्रकार परिषदेत मीच येऊन तुला सगळ्याचा जाब विचारेन. मग तुझ्या घरात परिषद घे, किंवा सामनाच्या कार्यालयात. जागा तू ठरव पण आमचं कुटुंब का बरबाद केलं याचं उत्तर तुला द्यावंच लागेल, असं समस्त मुंबईकरांच्या वतीने नितेश राणे म्हणाले.


पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा कार्टा छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या वाघनखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. म्हणजे जी भाषा हे जिहादी आपल्या देशात वापरतात, पॉप्युलर फ्रंट, रझा अॅकॅडमीसारख्या संघटना वापरतात, मुंब्राचा जितेउददीन वापरतो, ज्या भाषेत औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न निर्माण केले जातात, ती भाषा पेंग्विन ठाकरे वापरतो, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



नाहीतर आठवडाभरात मी आयटिनरी बाहेर काढेन...


मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्‍याबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍या आदित्य ठाकरेंना नितेश राणे यांनी याआधीही सुनावले आहे. आज ते म्हणाले की, मविआच्या काळात आदित्यने जो दाओस आणि लंडन दौरा केला त्याची आयटिनरी एका आठवड्यात जाहीर केली नाही तर ती फोटोंसकट मी जाहीर करेन. कोणकोण तिथे होतं, कुठलंही राजकीय पद नसताना वरुण सरदेसाई तिथे का होता, कुठला पाटणकर काढा घेण्यात आला ही सगळी माहिती आमच्याकडे फोटोंसकट आहे. जर दाओसच ठरलं होतं तर लंडनचा दौरा कोणाच्या पैशांनी केला? असा खडा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सळो की पळो करुन सोडले आहे.



आदित्यच्या म्याँव म्याँवची डरकाळी होत नाही


आदित्य ठाकरेंना उद्देशून नितेश राणे म्हणाले, लंडनला जाऊन आवाज सुधारण्यासाठी जो राजकीय पैसा वापरलास त्याने अजूनही तुझ्या म्याँव म्याँवची डरकाळी झालेली नाही. आताही मिस्टर की मिसेस हे विचारावं लागतं. म्हणून उगाच आमच्या नेत्यांवर मंत्र्यांवर, सरकारवर तोंड उघडलंस तर अशी माहिती बाहेर येईल, की आईवडील तुझं लग्नदेखील करु शकणार नाहीत.



...मग राऊतने नरेंद्र मोदीजींचं नाव घ्यावं


संजय राऊत सरकारविरोधी प्रश्न उपस्थित करत असतात याबाबत पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हा स्वतः चोर आहे. त्याचं कॅरेक्टर ढिलं आहे. त्याने कोविडमध्ये चोरीच्या पैशांवर आपल्या मुलीचं लग्न केलं. मुलीच्या लग्नात कोणी सोन्याची बिस्कीटं दिली हे त्याला विचारा. आणि खलिस्तान, पाकिस्तान यांवर त्याने बोलू नये, कारण याच्याच मालकाने मुंबईमध्ये रोहिंगे आणि बांगलादेशी लोकांना पोसलं आहे. त्यामुळे त्याने आधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि मग नरेंद्र मोदीजींचं नाव घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.



कोकणवासियांसाठी आम्ही सजग


नितेश राणे म्हणाले, कोकणवासियांना यावेळी परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. यासंबंधी नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही रेल्वेमंत्र्यांशी दोनदा बोललो आहोत. आमची अपेक्षा आहे की असा त्रास पुन्हा होऊ नये. कालही दिवा स्टेशनवर लोकांना प्रचंड त्रास झाला. रेल्वे बंद असल्याने मीही सहा वेगवेगळ्या बसेस सोडल्या. मात्र, भविष्यात असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांना जाऊन भेटणार आहोत. त्यांना विनंती करुन हा त्रास कायमचा कसा बंद होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र