मुंबई : घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर सोमवारपासून लागू झाले आहेत.
मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात ३ रुपयांची तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे मुंबईत आता ७६ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी ४७ रुपयांना मिळेल. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहनांचा वापर करतात. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो. यामुळे महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला दरकपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
याआधी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत ८ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति एससीएम कपात केली होती.
महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करत आहेत. पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मानला जातो.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…