मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटना बाह्य - राजेंद्र कोंढरे

  93

अविवेकी वक्तव्यामुळे समाजात तेढ


शिर्डी (प्रतिनिधी):ओबीसी समाजातील काही अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा तसेच इतर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटना बाह्य आहे असे परखड मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सभा व मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला.


अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे शिर्डी येथे करण्यात आले त्यावेळी कोंढरे अध्यक्षपदावरून बोलत होते. राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, अमोल निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक लालूशेठ दळवी, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकात बनकर, नाशिक महिला अध्यक्ष अस्मिता देशमाने, धाराशिव महिला अध्यक्ष रेखा लोमटे, युवक सरचिटणीस योगेश पाटील, मंगेश निकम, किशोर गिराम, अमोल पवार आदी उपस्थित होते.


भारतीय राज्यघटनेच्या आधारे निर्माण झालेला आरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी खटल्याच्या आधारे निर्माण झालेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या तरतुदीच्या आधारे आरक्षण धोरण राबविले जाते. या दोन्ही तरतुदीच्या आधार न घेता ज्यांनी ओबीसीतील अतिरिक्त आरक्षण अगोदरच बेकायदेशीर व्यापलेले आहे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास व कुणबी प्रमाणपत्रास विरोध करणे ही भूमिका घटनाबाह्य आणि कायद्याचा अवमान करणारी आहे.


दोन्ही समाज घटकांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे समाजा समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही सोशल मीडियावरील अविवेकी तेढ वाढवणाऱ्या पोस्ट टाळल्या पाहिजेत. हे त्यांना स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहे रोडमॅप जाहीर करावा. मराठा समाजाला यापुढे ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या तीन सूत्रावर आधारित क्रियाशील व्हावे लागेल.


एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेत ३० ते ५०% वाटा तसेच स्थान असलेल्या मराठा समाजाला आज राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत ३% पर्यंत खाली येण्याची कारणे शोधून त्यावर ते स्थान पुन्हा मिळविण्यासाथी काम करावे लागेल .


राज्याच्या विकासात प्रकल्पासाठी कवडीमोल दराने जमिनी घेतल्या इथला इतिहास घडवताना देशाचे संरक्षण करताना ज्या समाजाने त्याग केला आरक्षणाचे धोरण ज्यांनी निर्माण केले त्या समाजातील दुर्बलांच्या साठी सर्व समाजाने उभे राहणे गरजेचे आहे.


मागील सभेचे प्रोसडींग संयुक्त चिटणीस गुलाब गायकवाड यांनी वाचले. जमा खर्च, हिशोबा चे वाचन सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी वाचन केले. यावेळी अनेक सभासदांनी सूचना व ठराव मांडले. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी तर आभार अतिष गायकवाड यांनी मानले


कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी तालुकाध्यक्ष दिनकर पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुजित ढोकचौले, राहता तालुकाध्यक्ष रवीराज देसले,विलास वराळ, योगेश निकम, अनिकेत सदाफळ, सुमित निर्मल, अपासाहेब ढोकणे, ऋषिकेश भोसले, बापूसाहेब तनपुरे, विकी गायकवाड, सचिन मुजगुले, निलेश शेजवळ, बंटी नेरपगारे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन