Mathura Train Accident : मथुरेत रेल्वेला अपघात, ट्रॅक सोडून प्लॅटफॉर्मवर चढली ट्रेन

  159

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मथुरेतून(mathura) मोठी बातमी समोर आली आहे. येथे शकूरबस्तीवरून येणाऱ्या एका ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात(accident) झाला. ही ट्रेन अचानक ट्रॅक सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. दरम्यान, चांगली बाब म्हणजे जेव्हा हा अपघात घडला तेव्हा ट्रेनमध्ये कोणीही प्रवासी नव्हते.


या दुर्घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ सुरू झाला. लोक घाबरून इथे-तिथे पळू लागले. या अपघातात जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही ट्रेन अचानक ट्रॅक सोडून प्लॅटफॉर्मवर आली याचा तपास केला जात आहे.


 


मिळालेल्या माहितीनुसार, ही ईमयू ट्रेन शकूरबस्ती येथून येत होती. रात्री साधारण १०.४९ मिनिटांच्या सुमार ट्रेन मथुरा स्टेशनवर पोहोचली. यानंतर सर्व प्रवासी मथुरा स्टेशनवर उतरले. मात्र ही ट्रेन ट्रॅकवरून हटल्यावर प्लॅटफॉर्मवर चढली. या कारणामुळए प्लॅटफॉर्म तुटला तर ट्रेनचे काही भाग दुर्घटनाग्रस्त झाले. याच कारणामुळे इतर रेल्वेंवर परिणाम झाला.



अपघातामुळे काही गाड्यांवर परिणाम


याबाबत माहिती देताना मथुरा रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर एसके श्रीवास्तवने सांगितले की गाडी शकूरबस्ती येथून येत होती. यानंतर गाडीतून सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र अचानक ही गाडी ट्रॅक सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. याचा तपास केला जात आहे. या कारणामुळए प्लॅटफॉर्म आणि वरच्या शेडचे नुकसान झाले. तर काही गाड्यांवर परिणाम झाला. हा अपघात झाला तेव्हा रेल्वेत कोणीही प्रवासी नव्हते. नाहीतर मोठा अपघात झाला असता.

Comments
Add Comment

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी