Sharad Pawar : पवारांचा विजय पण संपूर्ण पॅनेलचा दारुण पराभव

Share

पवारांचे अनेक वर्षांचे वर्चस्व भाजपने संपुष्टात आणले!

मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब हाऊस (Garware Club House) निवडणुकीत (Garware Club House Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यांच्या डेव्हलपमेंट पॅनेलला दारुण पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली. मुंबई क्रिकेट संघटना व गरवारे क्लबमधील निवडणुकीत शरद पवार यांचे मागील अनेक वर्षांपासून असलेले वर्चस्व पाहता हा पराभव त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

गरवारे क्लब हाऊसची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी पवार हे अध्यक्षपदासाठी उभे होते तर इतर १२ पदांसाठी त्यांचे डेव्हलपमेंट पॅनेल रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी पवारांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपाध्यक्ष, खजिनदार आणि दहा व्यवस्थापकीय समिती सदस्य अशा १२ पदांसाठी मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी जीसीएच डायनॅमिक पॅनेल उभे करत या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. या निवडणुकीत क्लबच्या १३ हजार सदस्यांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मतदान केले.

यात पवार यांच्या डेव्हलपमेंट पॅनेलचे उपाध्यपदाचे उमेदवार राज पुरोहित यांच्यासह सर्वांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. जीसीएच डायनॅमिक पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केल्याने उपाध्यक्षपदासाठीच्या लढतीत सायरस गोरिमार यांनी राज पुरोहितांचा १,४३२ मतांनी पराभव केला. सायरस गोरिमार यांना २,४५२ मते मिळाली. तर राज पुरोहित यांना १,०२० मते मिळाली.

खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत मनीष अजमेरा यांनी दिलीप शाह यांचा पराभव केला. मनीष अजमेरा यांना २,४८४ मते मिळाली. तर दिलीप शाह यांना १,२५१ मते मिळाली.

गरवारे क्लबची नवी कार्यकारिणी

अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष सायरस गोरिमार, खजिनदार मनीष अजमेरा, व्यवस्थापकीय समिती सदस्य मोहित चतुर्वेदी, रोहित शाह, मनीष शाह, जनक गांधी, अमित शाह, कमलेश मोदी, चेतन बाविशी, कमलेश संघवी, नरेंद्र शाह, अनुज भार्गव, पायल शाह (महिला सदस्य)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

54 seconds ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago