कैटरीना-सलमानच्या 'Tiger 3'चा टीझर आऊट!

  36

बहुचर्चित 'टायगर ३'चा टीझर अंगावर शहारे आणणारा


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही डायनॅमिक जोडी पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार असून 'टायगर ३'च्या (Tiger 3) टीझरने सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं आहे. 'टायगर ३'च्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आज टीझर रिलीज झाला आहे.


'टायगर ३' हा सिनेमा खूपच दमदार असणार असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. टीझरमध्ये सलमान आणि कतरिना स्क्रीन शेअर करताना दिसत नाहीत. टीझरच्या सुरुवातीलाच सलमान खान म्हणत आहे, "माझं नाव अविनाश सिंह राठोड.. पण तुम्ही मंडळी मला टायगर म्हणून ओळखता. २० वर्ष देशाची सेवा केली. पण त्या बदल्यात मला काहीच मिळालेलं नाही. टायगर तुमचा शत्रू आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे. टायगर गद्दार आहे. गद्दार होतो की देशभक्त हे मी माझ्या मुलाला सांगणार नाही. जिंदा रहा तो आपकी खिदमत में फिर हाजिर नहीं तो जयहिंद...". १ मिनिट ४३ सेकंदाचा हा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे.





सलमानच्या 'टायगर ३' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता हा अॅक्शन-पॅक्ड सिनेमा बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर ३' त्याच्या अॅक्शन चित्रपटाची मेजवानी सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.


सलमान खानने 'टायगर ३' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे, "जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हरा नहीं... टायगर का मेसेज. येत्या दिवाळीत 'टायगर ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


'टायगर ३' या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. तर इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत.


हा अफलातून थ्रिलर आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून काय वेगळं असणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दिवाळी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर ३'चा टीझर बॉलीवूडमध्ये लक्ष वेधून घेत असून हा ब्लॉकबस्टर भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकेल आणि वर्षाच्या अखेरीस विजय सेतुपतीसह प्रदर्शित होणार्‍या कॅटरिनाच्या मेरी ख्रिसमसचीही चाहत्यांना अपेक्षा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स

६६व्या वाढदिवशी ‘बोल्ड’ लूकने सोशल मीडियावर धूम; नीना गुप्तावर कौतुक आणि टीकेची जोरदार चर्चा!

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकताच आपला ६६ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.

Deepika Padukone : अल्लू अर्जुन-अ‍ॅटलीच्या चित्रपटात दीपिका पादुकोणची जबरदस्त एंट्री

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सतत चर्चेत आहे. विशेषतः जेव्हा त्यांनी दिग्दर्शक संदीप

कोकणातला जुना वाडा, नवी पिढी आणि ‘अंधार माया’ वेब सीरिजचा गूढ प्रवास

'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!

मुंबई : प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'हेड ऑफ