हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ (Asian Games 2023) मध्ये भारताचे खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. आज आशियाई स्पर्धेचा चौथा दिवस असून या एकाच दिवशी भारताने आतापर्यंत सात पदकांची कमाई केली आहे. तर चार दिवसांच्या या सामन्यांत पाच सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि दहा कांस्यपदकांसह एकूण २२ पदकांची कमाई करत सर्वाधिक पदकांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
सिफ्ट कौर सामरा हिने ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. २५ मीटर पिस्तूल महिला सांघिकमध्ये मनू भाकेर, एशा सिंग, रिदम सांगवान यांनी सुवर्णपदक पटकावले, तर याच स्पर्धेच्या वैयक्तिक फेरीत ईशा सिंगने रौप्यपदक पटकावले. पुरुष गटात अनंतजीत सिंग नारुका याने रौप्य मिळवले. महिला २५ मीटर रायफल ३ पोझिशन्स टीमच्या आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर समरा यांनी रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष स्कीट टीममध्ये अंगद, गुर्जोत आणि अनंत जीत यांनी कांस्यपदक मिळवले. विष्णू सरवननने सेलिंगमध्ये कांस्यपदक जिंकून तालिकेत भर घातली. अशा एकूण सात पदकांची आज भारताने कमाई केली.
दरम्यान, चीनने ६८ सुवर्णांसह आपले वर्चस्व कायम राखले आहे. चीनने आतापर्यंत १२३ पदकांची कमाई करत सर्वोच्च स्थान गाठले आहे. त्यानंतर कोरियाने ५९ पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळवले आहे. जपान ५५ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर भारत २२ पदकांसह सहाव्या स्थानावर आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…