Indian National Games : आशियायी स्पर्धेत चेंबूरच्या आचार्य विद्यानिकेतन शाळेतील १३ खेळाडू करणार भारताचे प्रतिनिधीत्व

चेंबूर : गेली कित्येक वर्षे लोकमान्य शिक्षण संस्थेतील शरद आचार्य क्रीडा केंद्र श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर येथे ॲक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स (Acrobatics Gymnastics) हा खेळ सातत्याने खेळला जात होता. या खेळाने अनेक शिवछत्रपती पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू घडविले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचे, भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांची लयलूट केली.


मात्र १५ ते २० वर्षे सातत्याने सराव करूनही हा खेळ भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये नसल्याने खेळाडूंना ओळख मिळत नव्हती. त्यांची दखल घेतली जात नव्हती. परंतु 'सातत्याने प्रयत्न केले की त्याचे फळ मिळतेच' या उक्तीप्रमाणे हे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक सातत्याने सराव करत राहिले आणि इतक्या दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर ॲक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स हा खेळ इंडियन नॅशनल गेम्स/ इंडियन ऑलिम्पिक्स (Indian National Games/ Indian Olympics) मध्ये समाविष्ट झाला.


बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २४ सप्टेंबर २०२३ रोजी याची निवड प्रक्रिया पार पडली व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेतील सराव करणाऱ्या १३ खेळाडूंची यात निवड झाली. अक्षता ढोकळे, सोनाली बोराडे, अर्णा पाटील, प्रीती येखंडे, ऋतुजा जगदाळे, आचल गुरव, कुणाल कोठेकर, प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, आकाश गोसावी, आदित्य कासासे, आशुतोष रेनवकर इत्यादी खेळाडूंची निवड झाली आहे. राहुल ससाणे, सुनील रणपिसे, रमेश सकट, योगेश पवार या प्रशिक्षकांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. इतकंच नव्हे तर ऑक्टोबर मध्ये उसबेकिस्तान येथे होणार्‍या आशियायी स्पर्धेत हेच खेळाडू आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर