Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर मार्ग निघाला…

Share

धनगर शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य

अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj reservation) देण्याचा मुद्दा मार्गी लागतो न लागतो तोच धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा पेटून उठला आहे. गेल्या २१ दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर हे उपोषण करत असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आज उपचारासाठी १५ जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवण्यात आली. शिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील चौंडी या ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर धनगर आरक्षणावर जवळपास मार्ग निघाला आहे, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आंदोलकांशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यांनी सरकार पाठीशी असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र कोणतेही ठोस आश्वासन नसताना कोणत्या आधारावर उपोषण सोडायचे असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. त्यामुळे आज मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंदोलनस्थळी जाऊन धनगर शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळेस झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झालेली आहे. जवळपास मार्ग निघालेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाजन म्हणाले, मराठा आरक्षणाची मुदत संपलेली नाही. त्यासाठी एक समिती नेमलेली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीत निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू, असं महाजन यांनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago