हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Games 2023) चार घोडेस्वारांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या या घोडेस्वारी संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. याआधी नेमबाजांनी मंगळवारी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तर महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर मात करत सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर घोडेस्वारीमध्ये मिळालेले पदक हे यावर्षीचे तिसरे सुवर्णपदक आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताला घोडेस्वारीमध्ये (Equestrian dressage) सुवर्ण मिळाल्याने सर्वच स्तरांतून भारताच्या घोडेस्वारांचे कौतुक होत आहे.
घोडेस्वारांच्या चमूने मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. दिव्याकृती सिंगला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अनुषला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे हे सुवर्ण भारताच्या नावावर झाले. याआधी १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताला सुवर्ण मिळवण्यात यश आले आहे.
सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…