Murder: तिहेरी हत्याकांडाने नगर हादरले, आरोपी जेरबंद

शिर्डी (प्रतिनिधी) - कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह मेव्हणा,आजेसासू मिळून एकाच कुटुंबातील तिघांची धारधार चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये जिल्ह्यात घडली आहे. तसेच सासरे, सासू व मेव्हणीस जिवे  मारण्याचे प्रयत्नात गंभीर जखमी करून तिहेरी हत्याकांड करणारे आरोपी जावई व त्याचा भाऊ नाशिकच्या दिशेने पळून चालले होते. दरम्यान अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिर्डी पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच या दोन आरोपींना नाशिक जिल्ह्यात ताब्यात घेऊन जेरबंद केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरून गेला आहे या घटनेत गंभीर जखमीवर साईबाबा संस्थानचे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे बुधवार २० सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आरोपी जावई सुरेश उर्फ बाळू विलास निकम वय वर्षे ३२ व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम वय वर्षे २४ दोघे रा.संगमनेर सासुरवाडीला सावळीविहीर येथे आले होते. त्यांनी घराचा दरवाजा वाजवला व आतून दरवाजा उघडताच आरोपीने घरातील पत्नी वर्षा सुरेश निकम वय वर्षे २४, मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड,वय वर्षे २५,आजे सासू हिराबाई धृपद गायकवाड, वय वर्षे ७० या तिघांवर धारदार चाकूने निर्घृण वार करून त्यांची हत्या केली.


यादरम्यान सासू संगीता चांगदेव गायकवाड,सासरे चांगदेव धृपद गायकवाड,आणी मेव्हणी योगिता महेंद्र जाधव,वय वर्षे ३० या तिघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून दोन्हीही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी आरोपीची पत्नी वर्षा गायकवाड,मेव्हणा रोहित गायकवाड आणी आजेसासू हिराबाई गायकवाड या तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


तर सासू संगीता चांगदेव गायकवाड,सासरे चांगदेव धृपद गायकवाड आणी मेव्हणी योगिता महेंद्र जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.


नगर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.शिर्डी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर तसेच शिर्डी पोलिस स्टेशन असे चार पथके तातडीने रवाना करण्यात आले.सदरील गुन्ह्यातील आरोपींची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,पो.ना विशाल दळवी,पो ना.संदीप चव्हाण, पो.ना.रविंद्र कर्डीले,पो.ना.प्रशांत राठोड,पो.कॉ.जालींदर माने, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर,तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, शिर्डी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ थोरमीसे,पोना दिनेश कांबळे आदींनी नाशिक येथे जाऊन नाशिकरोड पोलिस स्टेशनचे सपोनी गणेश शेळके, पोसई रामदास विंचू,पो.ना घेगडमल, पोना पवार,पोकॉ जाधव, कासार,चत्तर,लोणारे यांची मदत घेऊन तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम व रोशन कैलास निकम यांचा पाठलाग करत त्यांना नाशिकरोड येथे शिताफीने जेरबंद केले.


आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम याचा पत्नी वर्षा हिच्याबरोबर नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पती सुरेश दारू पिऊन पत्नी वर्षा हिस सतत शिवीगाळ,मारहाण करत असे.यास त्रासाला कंटाळून मयत वर्षा हि आपल्या दोन मुलींना बरोबर अधूनमधून माहेरी येऊन जाऊन राहत होती. यासंदर्भात मयत वर्षा हिने मागील महिन्यात पती सुरेश निकम याच्या विरोधात संगमनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली करून पाच महिन्याची स्वरा आणी सहा वर्षाची माही या आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वडीलांकडे राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यानंतर आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम याने सासुरवाडीला येऊन पत्नी आणी सासू यांना शिवीगाळ केली असल्याने त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.याचा मनात राग धरून आरोपीने सासुरवाडीच्या कुटुंबातील सहा जणांवर धारधार चाकूने वार करत तिघांची निर्घृणपणे हत्या केली आहे, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डीत उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना