women reservation bill: महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत आज चर्चा, सोनिया गांधी करणार सुरूवात

  128

नवी दिल्ली : सरकारने संसदेच्या सभागृहांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण(women reservation bill) देण्याशी संबंधित ऐतिहासिक नारी शक्ती वंदन विधेयक(Nari Shakti Vandan Act) मंगळवारी लोकसभेत सादर केले. मंत्री अर्जुनरागव मेघवाल यांनी विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक सादर केले. नव्या संसद भवनात सादर झालेले हे पहिले विधेयक आहे.


आता या विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. येथे भाजपाकडून केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, दीया कुमारी या आपले मत मांडणार आहेत. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली की काँग्रेसकडून अध्यक्ष सोनिया गांधी याची सुरूवात करतील. अधिकाधिक पक्ष याबाबत आपल्या महिला खासदारांना चर्चेदरम्यान बोलण्याची संधी देऊ शकतात.


लोकसभेत बुधवारी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू होईल. लोकसभा आणि राज्यसभे या दोन्ही सदनात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपती यांची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा कायदा बनेल. हा कायदा बनल्यावर लोकसभेत ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होईल आणि महिला खासदारांची संख्या १८१ होईल.


सध्या लोकसभेता महिला खासदारांची संख्या केवळ ८२ इतकी आहे. या नव्या विधेयकात महिला आरक्षण केवळ १५ वर्षे लागू करण्याची तरतूद आहे. मात्र भविष्यात संसदेत याचा कालावधी वाढू शकतो.

Comments
Add Comment

देशाचा जीडीपी पुढील वर्षी ६.५ टक्क्यांवर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : वित्त वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढ दर रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मौद्रिक धोरण

Narendra Modi : भारताचं दमदार प्रत्युत्तर! अमेरिका-चीनची चिंता वाढणार, टॅरिफनंतरही अर्थव्यवस्थेत दिलासादायक गुडन्यूज

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग

उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपला देणार टक्कर? तामिळनाडूच्या खासदाराचे नाव चर्चेत

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता'इंडिया' आघाडीच्या वतीने

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ही खास भेटवस्तू

नवी दिल्ली: भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला

Airtel Down: एअरटेल सेवा बंद! कॉल आणि इंटरनेट सेवेवरही परिणाम

मुंबई: एअरटेल डाउन डिटेक्टरनुसार देशभरातील एअरटेल ग्राहकांना गेल्या काही तासांपासून नेटवर्क आणि इंटरनेट