MLAs Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे आदेश

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेप्रकरणाच्या(MLAs Disqualification Case) याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहे. न्यायालयाने राज्याच्या विधानसभा अध्यक्षांनी या अपात्रतेप्रकरणातील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करावी असे आदेश दिलेत. तसेच याबाबतची वेळेची मर्यादा ठरवावी असेही न्यायालयाने सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालयात दोन आठवड्यानंतर याबाबतची सुनावणी करणार आहे. त्यामुळे त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत उचललेल्या गेलल्या कारवाईची माहिती न्यायालयास दिली जावी असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.

अपात्रतेचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबिता राहू शकत नाही


सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटले की अपात्रतेचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबित राहू शकत नाही. उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले की कोर्टाच्या ११ मेच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील राजकीय वादावर निर्णय देताना दिलेल्या आदेशांचा सन्मान केला जाईल अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायलयत करते. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील निर्णयाच्या विलंबाबाबत मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले, अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान केला पाहिजे.

एकनाथ शिंदेना शिवसेना हे नाव तसेच पक्षचिन्ह दिल्याविरोधातही केस आहे दाखल


उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि त्यांचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याविरोधातही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या प्रकरणी ३ आठवड्यानंतर सुनावणी करणार असल्याचे सांगितले.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी