Asia cup 2023: श्रीलंकेला नमवत भारताने जिंकला आशिया चषक

कोलंबो: वर्ल्डकप २०२३ची रंगीत तालीम असलेल्या आशिया चषकमध्ये भारताने बाजी मारली. भारताने आशिया चषकच्या(asia cup 2023) अंतिम फेरीत श्रीलंकेला एकतर्फी हरवत विजेतेपद पटकावले. पहिल्यापासूनच भारताने श्रीलंकेवर दबाव टाकला त्यामुळे श्रीलंकेला डोके वर काढताच आले नाही.


श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यानेच घात केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आपल्या संपूर्ण संघाचे मिळून केवळ अर्धशतकच ठोकता आले.



सिराजचा भेदक मारा


भारताच्या मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंका हतबल झाली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजसमोर अक्षरश: लोटांगण घातले. लंकेच्या केवळ दोनच फलंदाजाना १७ आणि १३ इतकी धावसंख्या करता आली. तीच त्यांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. बाकी इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.


भारताच्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे अर्धा डझन फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही त्याला सुरेख साथ दिली. त्याने ३ विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला धावसंख्या वाढवूच दिली नाही.



सलामीवीरांनीच पूर्ण केले आव्हान


श्रीलंकेने दिलेले केवळ ५० धावांचे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केले. भारताच्या सलामीला आज इशान किशन आणि शुभमन गिल उतरले होते. इशान किशनने २३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ धावा केल्या आणि भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या