‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट, मालिका, संगीत, नाटक, अॅनिमेशन, पाककृती यावर प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. आज जरी अल्ट्रा झकास लोकप्रिय झालेले असले तरी त्याच्या मागे एका व्यक्तीचे अपार कष्ट दडलेले आहेत.
ती व्यक्ती म्हणजे अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीइओ सुशीलकुमार अग्रवाल होय. त्यांनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. भविष्यात मनोरंजन क्षेत्रात, वितरणात तंत्रज्ञान एक महत्त्वाची भूमिका बजावेल असा आत्मविश्वास त्यांना होता. १९८२ मध्ये त्यांनी एक दशलक्ष रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह VHS व्हीडिओ कॅसेट निर्मिती सुविधा सुरू केली. त्यासाठी त्यांच्या वडिलांकडून खूप मार्गदर्शन व पाठिंबा मिळाला. राष्ट्रीय व प्रादेशिक भाषेतील मनोरंजनात प्रेक्षकांच्या आवडीमध्ये फरक पडतो.
एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांनी दोन्ही भाषांमध्ये समतोल राखला आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक आहोत, जे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये वर्षाला एक हजारांहून अधिक चित्रपट तयार करतो. विविध डब केलेल्या भाषांमध्ये आणि कंटेंट उपलब्ध असल्यामुळे भारतातील सर्व वयोगटातील दर्शकांची संख्या वाढत आहे. देशभरातील प्रादेशिक ओटीटीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहे.
आजकाल आपण पाहत आहोत बरेचसे ओटीटी माध्यम इंग्रजी किंवा हिंदी कंटेंट आणत आहेत. त्यांनी ‘अल्ट्रा झकास’ हा मराठी ओटीटी माध्यम आणला आहे, जे जागतिक स्तरावर अतुलनीय कंटेंट पाहण्याचा अनुभव देतो. यात मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, संगीत, नाटक, अनिमेशन आणि खाद्यपदार्थांच्या पाककृतींना सादर करतो. त्यांच्याकडे २००० पेक्षा जास्त कंटेंट उपलब्ध आहे व नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न आहे. हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी भाषेमध्ये प्रदर्शित करणारे हे भारतातले पहिले ओटीटी माध्यम आहे.
मनोरंजनकर्ता म्हणून त्यांच्या आयुष्यात अनेक टर्निंग पॉइंट आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अल्ट्रा व्हीसीडी तंत्रज्ञान भारतात येऊन व्हीसीडीचे एन्कोडिंग आणि ऑथरिंग आणण्यातही ते अग्रणी ठरले आणि हिंदी चित्रपट आणि संगीत कॅसेट्स उद्योगात प्रचंड यश मिळवलं. दुसरे म्हणजे मिंटेज वर्ल्डचे लाँचिंग, व्हिंटेजसाठी जगातील पहिले ऑनलाइन संग्रहालय समकालीन भारत आणि जगाला त्यांच्या समृद्ध ऐतिहासिक वारसा, परंपरेबद्दल शिक्षित करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ बनले. तिसरे म्हणजे हे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट्रा झकास’ लाँच केले गेले जे एक मराठी ओटीटी माध्यम आहे.
मुख्यतः त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने देशातल्या कोपऱ्यातल्या प्रेक्षकाला समजून घेऊन त्यांना नेमके काय आणि कसे मनोरंजन हवे आहे आणि तसे देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकांचा अभिप्राय लक्षात घेऊन त्यानुसार त्यांनी मनोरंजन पद्धतींमध्ये बदल केला कारण म्हणतात ना बदल ही काळाची गरज आहे.
हे खर आहे की दोन्ही राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषेतील मनोरंजनात प्रेक्षकांच्या आवडीमध्ये फरक पडतो. एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांनी दोन्ही भाषांमध्ये बरोबरच समतोल राखला आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक आहोत जे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये वर्षाला १०००हून अधिक चित्रपट तयार करतो. विविध डब केलेल्या भाषांमध्ये आणि कॉन्टेन्ट उपलब्ध असल्यामुळे भारतातील सर्व वयोगटातील दर्शकांची संख्या वाढत आहे. देशभरातील प्रादेशिक ओटीटीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहे.
आजकाल बरेचसे ओटीटी माध्यम इंग्रजी किंवा हिंदी कॉन्टेन्ट आणत आहेत. या सगळ्यातून ते एक असा ओटीटी माध्यम प्रेक्षांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामध्ये विविध भाषांचे चित्रपट मराठीमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. ‘अल्ट्रा झकास’ हे एक मराठी ओटीटी माध्यम आहे, जे जागतिक स्तरावर अतुलनीय कॉन्टेन्ट पाहण्याचा अनुभव देतो. यात मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, संगीत, नाटक, अॅनिमेशन आणि खाद्यपदार्थांच्या पाककृतींना सादर करतो. सध्या आम्ही २०००+ तासांचा कॉन्टेन्ट सादर करत आहोत आणि यापुढे सतत नवीन कॉन्टेन्ट आणण्याच्या प्रयत्नात आहोत. हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी भाषेमध्ये प्रदर्शित करणारे हे भारतातील पहिले ओटीटी माध्यम आहे. केवळ १ वर्षाचे सदस्यत्व घेऊन संपूर्ण कुटुंब प्रति वर्ष १ रुपयांपेक्षा कमी रकमेमध्ये ‘अल्ट्रा झकास’ पाहू शकतो. आजपर्यंत ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीचे १,००,०००हून अधिक डाऊनलोड झाले आहे.
‘अल्ट्रा झकास’ची निर्मिती करण्यापूर्वी त्यांनी प्रेक्षकांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार आणि वेळापत्रकानुसार त्यांच्या मनोरंजनाची आवश्यकता जाणून घेतली. चित्रपट निर्मिती, वितरण, प्रदर्शन या बाबतीत इंडस्ट्री सतत बदलत आहे. विविध वयोगटांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारच्या जाहिरातींचा आणि सर्व्हेचा वापर केला. त्याचबरोबर मनोरंजन पुरवणारे प्रतिस्पर्धी भारतात आणि जागतिक स्तरावर काय करत आहेत, याची माहिती ठेवून त्यानुसार आपण काय वेगळं देऊ शकतो आणि प्रेक्षकांना आपल्याकडे जास्तीत जास्त कसे आकर्षित करू शकतो, याकडे त्यांनी लक्ष दिले.
गेली ४१ वर्षे तुम्ही सतत विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहात, मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटते? असे विचारले असता ते म्हणाले की, हा खरोखरच खूप सुंदर आणि समृद्ध करणारा प्रवास होता. आम्हाला अल्ट्राच्या ब्रँड अंतर्गत लॉन्च केलेल्या मनोरंजनाच्या विविधतेतून बरेच काही शिकायला मिळाले. त्यानं आमच्या प्रेक्षकांनुसार स्वतःला सतत काळाच्या पुढे ठेवले आहे. आम्ही विविध शैलींमध्ये विविध प्रकारचे मनोरंजन प्रेक्षकांसाठी सादर केले, त्यामुळे आमच्या रसिक प्रेक्षकांमध्ये एक मजबूत ब्रँड रिकॉल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…