Shocking! नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात ३ महिन्यांत १७९ मुलांचा मृत्यू

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली 'लक्ष्य ८४ दिवस' मिशनची घोषणा


नंदुरबार : नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात (Nandurbar Civil Hospital) बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल १७९ मुलांनी आपला जीव गमावल्याची (Shocking) नोंद आहे.


नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सावन कुमार (M Sawan Kumar) यांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये, हॉस्पिटलमध्ये ७५ बालमृत्यूची नोंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या ८६ वर पोहोचली आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १८ अतिरिक्त मृत्यूची नोंद झाली आहे.


कुमार यांच्या मते, या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी ७० टक्के मृत्यूंमध्ये ०-२८ दिवसांच्या मुलांचा समावेश होता.


कुमार यांनी असेही नमूद केले की, या परिसरातील अनेक महिलांना सिकलसेल रोगाचा त्रास होता. ज्यामुळे बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्या. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांचे जीव वाचवण्याची गरज ओळखून, नंदुरबारमधील अधिकाऱ्यांनी 'मिशन लक्ष्य ८४ दिवस' या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. बालमृत्यूची मूळ कारणे हाताळणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि अर्भकांना जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Jalgaon : बुरहानपूर येथे २५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; भुसावळ-खंडवा मार्गिकेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची