नंदुरबार : नंदुरबार ग्रामिण रुग्णालयात (Nandurbar Civil Hospital) बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल १७९ मुलांनी आपला जीव गमावल्याची (Shocking) नोंद आहे.
नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सावन कुमार (M Sawan Kumar) यांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये, हॉस्पिटलमध्ये ७५ बालमृत्यूची नोंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या ८६ वर पोहोचली आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १८ अतिरिक्त मृत्यूची नोंद झाली आहे.
कुमार यांच्या मते, या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी ७० टक्के मृत्यूंमध्ये ०-२८ दिवसांच्या मुलांचा समावेश होता.
कुमार यांनी असेही नमूद केले की, या परिसरातील अनेक महिलांना सिकलसेल रोगाचा त्रास होता. ज्यामुळे बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्या. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांचे जीव वाचवण्याची गरज ओळखून, नंदुरबारमधील अधिकाऱ्यांनी ‘मिशन लक्ष्य ८४ दिवस’ या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. बालमृत्यूची मूळ कारणे हाताळणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि अर्भकांना जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…