मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात जायला आतुर झालेल्या चाकरमान्यांना खुश करण्यासाठी राणे कुटुंबीय नेहमीच सजग असतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चाकरमान्यांना मोफत गावी जाता यावे यासाठी माजी खासदार निलेश नारायण राणे (Nilesh Narayan Rane) यांनी पुढाकार घेतला. दादर ते कुडाळ (Dadar to Kudal) अशा मोफत ‘भाजप एक्स्प्रेस’चे (BJP Express) निलेश राणे यांनी आयोजन केले. याला कोकणवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांनी आज दादर स्टेशन फुलून गेलं होतं. सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जमा झाली होती. ज्यांनी या सेवेसाठी अर्ज केला होता त्या कोणाचेही नुकसान होऊ नये याची यावेळेस खबरदारी घेण्यात आली. माजी खासदार निलेश राणे यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन तो फडकावला आणि दुपारी १२ वाजता वेळेत ही ट्रेन सोडण्यात आली. यावेळेस रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.
निलेश राणे यांनी हात हलवत सर्वांना निरोप दिला आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व कोकणवासीयांचे चेहरे आनंदाने खुलले होते. ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वांनी निलेश राणे यांचे आभार मानले. आजची ही दादरची दृश्ये आणि ‘भाजप एक्स्प्रेस’ सुटतानाचे खास क्षण टिपले आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी…
दरम्यान, उद्या देखील दुपारी १२:३० वाजता आमदार नितेश राणे यांच्यातर्फे ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस फलाट क्रमांक ८ वरुन सुटणार आहे. शिवाय यामध्ये प्रवाशी गणेशभक्तांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…