मराठवाड्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सरकारची ५९ हजार कोटींची घोषणा

संभाजी नगर : तब्बल सात वर्षांनी संभाजी नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल ५९ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते.


या बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देताना सांगितले की, मराठवाड्यासाठी आज १४ हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या बैठकीत एकूण ५९ हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचा समावेश आहे.


आजच्या बैठकीबद्दल मोठी चर्चा सुरु होती. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना ही बैठक झाली होती. राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकजण म्हणतात फक्त घोषणा होतात. पण, आतापर्यंत आमच्या मंत्रीमंडळाने सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही ३१ निर्णय घेतले होते. २०१७ मध्ये यातील १० विषय मार्गी लागले होते. तर आज घडीला यातील २३ विषय मार्गी लागले असून, ७ विषय प्रगतीपथावर असल्याचे फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखिल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार मुंबई : कोकणच्या लाल

Kumbhdoot App : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले 'कुंभदूत ॲप'चे अनावरण

- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये

सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता

नोकरी लावून देतो सांगत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध

चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात