Snehalaya English Medium school : अभिमानास्पद! जगातील तीन सर्वोच्च शाळांमध्ये आपल्या अहमदनगरची शाळा...

श्रीमंतांची नव्हे तर गरजू मुलांसाठीची शाळा


स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलने कशी घातली जगाला भुरळ?


अहमदनगर : महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा घटना सातत्याने घडत आहेत. जी-२० मध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा होता. याशिवाय महाराष्ट्राचे खेळाडू देखील जागतिक पातळीवर आपलं नाव कमावत आहेत. त्यातच आणखी एक अभिमानास्पद बाब म्हणजे अहमदनगरमधील (Ahmednagar) 'स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल' (Snehalaya English Medium school) या शाळेची जगातील तीन सर्वोच्च शाळांमध्ये निवड झाली आहे. संकटांवर यशस्वी मात करत वंचितांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा यत्न या शाळेने केला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ही शाळा अविरतपणे हे ज्ञानार्जनाचं काम करत आहे.


आधुनिक प्रयोगशाळा (Science Lab), भौगोलिक पार्क (Geographic park), सहा हजार पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय (Liabrary), विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता कलादालन (Art room), कौशल्य विकास केंद्र या सगळ्या सुविधांमुळे या शाळेला नावाप्रमाणेच स्नेहालय बनवलं आहे. ही शाळा माणुसकीचे धागे जोडत अनाथ, गरजू, वंचित मुलांना तसंच सेक्स वर्कर्सची मुलं, एचआयव्ही बाधित मुलं अशा मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. सध्या शाळेत ३५० मुलं शिक्षण घेत आहेत.


स्नेहालय शाळेच्या संचालिका प्रीती भोवे यांनी सांगितले की, वंचित, अनाथ वर्गांतून जी मुलं येतात त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणं, त्यांचं शिक्षण होणं ही अत्यंत गरजेची बाब होती. आमचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी हे जेव्हा नगरच्या नावाजलेल्या शाळांमध्ये गेले तेव्हा त्यांना या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही पैसे देतो पण आम्ही त्यांना आमच्या शाळेत प्रवेश देऊ शकत नाही अशी उत्तरं मिळायची. तेव्हा त्यांनी या मुलांसाठी स्वतःच शाळा काढायचं ठरवलं. त्यानंतर सिप्ला फाऊंडेशनने आम्हाला ही शाळेची इमारत बांधण्यासाठी मदत केली, असं त्या म्हणाल्या.


शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि भविष्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कौशल्य विकासाचे धडेसुद्धा इथे दिले जात आहेत. त्यामुळेच स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलची टी-४ शिक्षण संस्थेने (T-4 Education Organisation) जागतिक पातळीवर नोंद घेतली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत