Mahadev Online Gaming App : टायगर श्रॉफ, सनी लिओनी, नेहा कक्करसह १४ बॉलीवूडकर लग्नाला गेले आणि पस्तावले!

विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींनी लावली होती उपस्थिती


मुंबई : 'महादेव ऑनलाइन गेमिंग ॲप'च्या (Mahadev Online Gaming App) कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी टाकली आहे. या छापेमारीमध्ये ४१७ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. यात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सनी लिओनी (Sunny Leone), नेहा कक्करसह (Neha Kakkar) जवळजवळ १४ बॉलीवूडकर ईडीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यत ईडीनं तब्बल ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात एकूण ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या रोख देवाण-घेवाणीची चौकशी होणार आहे. यात नुसरत भरुचाचेही (Nusrat Bharucha) नाव घेतले जात आहे. बॉलीवूडमधील विशाल दादलानी (Vishal Dadlani), कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) यांचाही यात समावेश आहे. शिवाय यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे.



विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींनी लावली होती उपस्थिती


महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगसंदर्भात एका भव्य लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या (Saurabh Chandrakar) लग्नसोहळ्यातील आहे. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी एक आहे. या विदेशातील मोठ्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. त्यांना एका प्रायव्हेट प्लेनमधून त्या लग्नासाठी नेण्यात आले होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग ॲपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार आता ईडीकडून कारवाई सुरु आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत

दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा तातडीने शोध घेण्याचे, पोलीस उपायुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखड्याची होणार मांडणी

मुंबई : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या आर्थिक

Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात

उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर