यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात यापुढे अशासकीय भाषा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर सभागृहात ५० खोक्यांची भाषा झाल्यास त्यांना ५० ठोसे दिले जातील आणि त्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांनी तयार राहावे. आज जी परिस्थिती आहे, ती भविष्यात मोठ्याप्रमाणात उद्भवेल आणि तेव्हा समारेच्या बाजुला जाण्याचीही तयार ठेवा असाही कानमंत्र सभागृहनेत्यांनी महायुतीच्या नगरसेवकांना दिला. मात्र, याचबरोबरच महापालिका सभागृहात अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्या सदस्यांवर तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली असून त्यादृष्टीकोनातून येत्या सभागृहांची दिशा बदलेली पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिका सभागृहात विराेधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनात झालेल्या अपमानप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहात जे वर्तन घडले ते दुर्दैवी आहे. मात्र आता भविष्यात आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. पाण्यात दगड मारायचा आणि पळ काढायचा असा प्रकार होतच राहणार. तसे खोक्याचे आरोप करत चिमटे काढणे असे प्रकार होतच राहणार. ही भाषा बरोबर नाही. पण यापुढे ५० खोक्यांचे जे भाषा करतील त्यांना ५० ठोसे देण्यासाठी तयार रहा. ही भाषा बरोबरच नाही.आज पेंग्विनचा उल्लेख केल्याशिवाय बैठक होत नाही आणि असे काैतुक करत पुढील वर्षी काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो.


तत्पूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका व स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी उबाठाच्या नगरसेवकांकडून अमेय घोले यांना उद्देशून बोलायला तोंड आहे का असे बोलत ५० खोके अशी घोषणाबाजी केली याचा समाचार घेतला. यापुढे अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी स्थायी समितीवर नाग बसला म्हणून बोलायचे. पण स्थायी समितीवर नाग नाही तर शेषनाग असून ते या तिजोरीचे रक्षणकर्ते आहेत. पूर्वी ही स्थायी समिती कोणाच्या इशाऱ्यावर चालायची असा सवाल करत मातोश्री २ कुठल्या पैशातून बांधली असा सवाल केला. तसेच पूर्वी खोके कुठे जात होते. पूर्वी मातोश्रीवरुन आदेश आल्याशिवाय एकतरी प्रस्ताव मंजूर केला जायचा का असा सवाल केला. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असे ब्रीदवाक्य घेवून फिरणऱ्या नेत्याने जेव्हा आमच्या घरावर इन्कम टॅक्स,ईडीची धाड पडली तेव्हा, तुमचे तुम्ही बघा म्हणून सांगितले. पण आमचे कुटुंब, आमची जबाबदारी सांगणाऱ्या नेत्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आजच आमच्यावर एवढे खोके, तेवढे खोके म्हणून आरोप करतात, तर मग हे शोधून दाखवा ना असे आव्हान दिले. कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे पावित्र्य टिकवले गेले पाहिजे,असे सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये