मुंबई : वर्षानुवर्षे आमच्या मनात जो संशय होता तो हळू हळू वाढत चालला आहे किंबहुना त्यावर शिक्कामोर्तब होत आहे की, खरंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पुत्र आहे का? की त्याला मुंबईतील कचऱ्यातून उचलून ठाकरे आडनाव दिल आहे? त्याचे गुण आणि विचार पाहता डीएनए तपासणीची गरज वाटत आहे. कुठल्याच बाजूने हा बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र वाटत नाही, असा जोरदार प्रहार भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आज जुहू येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचं रक्त त्याच्यात असेल, तो खरंच त्यांचा पुत्र असता तर हिंदू धर्माबद्दल होणारी भाषणं, राम मंदिराच्या निर्माणासंदर्भात होणारी वक्तव्यं आणि काँग्रेसच्या ज्या प्रकारे तो प्रेमात पडला आहे ते बघितल्यानंतर हा बाळासाहेबांचा मुलगा होऊच शकत नाही, ठाकरेंच्या घरात जन्माला येऊच शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
ज्या राम मंदिराच्या निर्माणासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या आयुष्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व संकटांना सामोरे गेले, कायम कडवट भूमिका घेतली. त्यांचा मुलगा म्हणून जो स्वतःला म्हणवून घेतो तो राम मंदिर येथे जाणाऱ्या भक्तांच्या बस आणि ट्रेनमध्ये दंगल होईल, आग लागेल असं म्हणतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा हा मुलगा आहे का? असा प्रश्न पडतो.
दुसऱ्यांच्या शरीराबद्दल हा व्यक्ती बोलतो. हातवारे करुन दुसऱ्यांच्या शरीराचं विश्लेषण करतो पण त्याला स्वतःच्या शरीराचा थांगपत्ता नाही. पुरुष आहे की स्त्री हे तपासण्याची आता वेळ आली आहे. उभं राहायला याला दोन माणसं लागतात आणि अशा व्यक्तीने दुसऱ्यांच्या शरीरावर बोलणं याला सडलेली वांगी बोलायचं की वाकलेली काकडी बोलायचं?
२०१४ ते २०१९ मध्ये जेवढं रक्ताच्या भावाने सांभाळल नाही तेवढं प्रेम आणि विश्वास देवेंद्रजी यांनी उद्धवला दिला. याच्यासारखा नमकहराम ज्या मातोश्री २ मध्ये राहतोय ते मातोश्री २ हा देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे. त्या देवेंद्रजींवर असं बोलत असशील तर तुझं थोबाड बंद करण्याची हिंमत आमच्याकडे आहे. पोलिसांना मी सांगेन की महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवायची असेल तर याचं थोबाड बंद ठेवा. नाहीतर आमचे कार्यकर्ते कोणत्या तरी सभेमध्ये स्टेजवर जातील आणि लाथांनी आणि चपलेने तुडवून तोंडावर काळी शाई फासतील, मग त्यांच्यावर केसेस करायच्या नाहीत. ही धमकी किंवा आवाहन समजा, असं नितेश राणे म्हणाले.
भास्कर जाधव नावाचं एक पिसाळलेलं कुत्रं सोडलेलं आहे. आता त्याला नक्की कुत्रा म्हणावं की पिसाळलेला डुक्कर म्हणावं? कारण डुक्कर आणि याला बाजूबाजूला उभं केलं तर डुक्करही हा माझ्यापेक्षा वाईट दिसतो, असं म्हणेल. जाधवला आमच्याकडे सोंगाड्या म्हणतात. याची जुनी भाषणं किंवा वक्तव्य बघा. याच भास्कर जाधवने आदित्य ठाकरेला बायल्या म्हटलं आहे. उद्धव ठाकरे किती मोठा नालायक आहे, असं म्हटलं आहे. गेल्यावेळी घरावर हल्ला झाला तेव्हा हा शेंबुड पुसत पुसत रडत होता. याच्यासारख्या पिसाळलेल्या डुकराने परत बावनकुळे साहेबांविषयी तोंड उघडलं तर त्याला महाराष्ट्रामध्ये फिरु देणार नाही.
मनोहर जोशींचं घर जाळायला महाराष्ट्राच्या बंटी बबलीने सांगितलं हे सत्य काल सदा सरवणकरांनी उघड केलं. कधी राज साहेबांच्या मागे लागायचं, कधी मनोहर जोशीचं घर जाळायला सांगायचं, राणेसाहेबांचं घर जाळण्याचं षडयंत्र रचायचं हेच या बंटी आणि बबलीने केलं आहे. संजय राजाराम राऊतसारखा खिचडीचोर त्याने मुलीच्या नावाने गरीब कामगारांची खिचडी चोरली आहे. आणि हा आमच्या नेत्यांना आणि जी-२० च्या परिषदेला गावजेवण म्हणणार? अशा शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊतांचे वाभाडे काढले.
राम मंदिराविषयी केलेल्या वक्तव्याबाबत NIA ने उद्धव ठाकरे यांना अटक करावी. उद्धव ठाकरे याचा इतिहास दंगली घडवण्याचा आहे. दंगली भडकवल्याशिवाय तो सत्तेत येऊ शकत नाही हे त्याला माहित आहे. आज राहुल गांधी युरोपमध्ये जाऊन चीनचे जे गोडवे गातोय, हिंदूविरोधी जी भूमिका घेतोय, ती आता उद्धव ठाकरे घ्यायला लागला आहे. याला उद्धव ठाकरे म्हणायचं की उद्धव गांधी म्हणायचं हा आता आमच्यासमोर प्रश्न आहे, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…