जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यांच्या सभांमध्ये सरकारवर टीका करत असतात. मात्र, अत्यंत गैरकारभारी उद्धव ठाकरेंवर भाजप नेत्यांकडूनही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी जळगाव (Jalgaon) येथे सभा घेतली होती. त्यात तर त्यांनी देवेंद्रजींवर टीका करत हद्द पार केली होती. यावर अजित पवारांनीही (Ajit Pawar) त्यांना खडे बोल सुनावले. आज जळगावातच ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अजितदादांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले.
अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठेही गेलो तरी विकासाचं बोलतो मात्र काही जण येतात आणि बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का? मी पण वाभाडे काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत. यातून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
अजितदादांनी यावेळी जळगावच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वनासनही दिले. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस कमी पडला. त्या तालुक्यात पाऊस पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही अजित पवार म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…