Maratha reservation: जालना आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(maratha reservation) आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत जालना तसेच राज्यातील मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


राज्यात कायदा-सुव्यवस्था आबाधित राहावी, जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आहे. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्यात्यावेळेस ते ते राजकीय पक्ष तसेच विरोधी पक्षातील नेत्यांची अशा प्रकारची बैठक झाली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर सरकारने जालना तसेच राज्यात ज्या ठिकाणी आंदोलने झाली त्याबाबत दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


झालेल्या घटनेची खंत साऱ्यांनीच व्यक्त केली आहे. गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनीही जाहीरपणे माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. लाठीचार्जचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील हे ही आपले उपोषण मागे घेण्यास तयार नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही