Accident: बीड-परळी मार्गावरील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

बीड: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (accident) घटना घडली. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रात्री ९च्या सुमारास हा अपघात घडला.


या महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय ३५), नोमान अजीम शेख (वय १३) आणि अदनान अजीम शेख (वय १२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर अजीम शेख हा रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अजीम शेख आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन सकाळी गव्हाण येथे सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षेचा चुराडा झाला.


या अपघातात अजीम शेख यांची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वत:गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये