G20 Summit 2023 : जी - २० परिषदेत 'भारत' आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे...

स्वागतपर भाषणात मोदींकडून देशाचा उल्लेख 'भारत'


नवी दिल्ली : दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या 'भारत मंडपम'मध्ये जी - २० शिखर परिषदेला (G20 Summit 2023) सुरुवात झाली आहे. यावेळी जी - २० परिषदेत 'भारत' आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे, अशी सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी जगाला आपल्या देशाची ओळख करुन दिली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृतरित्या भारत हेच नाव वापरले जाणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ संविधानिक प्रक्रिया बाकी राहिली आहे.


स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी मोरोक्को येथे झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली तसेच ही आपत्ती लवकर टळावी यासाठी प्रार्थना केली. पुढे ते म्हणाले, ज्या ठिकाणी आपण एकत्रित आहोत इथून काही किमी अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलंय की, मानवतेचं कल्याण आणि सुख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुयात.


एकविसाव्या शतकाचं महत्त्व पटवून देताना पंतप्रधान म्हणाले, २१ व्या शतकाचा हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्वाचा काळ आहे. हा तो काळ आहे ज्यात अनेक वर्षांपासून आपल्या समोर असलेली आव्हानं आपल्याकडं नवा तोडगा मागत आहे. यासाठी आपल्याला मानवकेंद्रीत राहून आपली प्रत्येक जबाबादारी पार पाडत पुढे जायचं आहे.



जागतिक अविश्वासाला विश्वासात रुपांतरित करुयात


कोविड १९ च्या काळात जगावर सर्वात मोठं एकमेकांवरील विश्वासाचं संकट आलं होतं. युद्धानं या विश्वासाला गेलेला तडा अधिक वाढवला आहे. जर आपण कोविडला हरवू शकतो तर आपण परस्पर विश्वासावरच्या या संकटावर देखील विजय मिळवू शकतो. आज जी २० च्या अध्यपदावरुन भारत संपूर्ण जगाला आवाहन करतो आहे की, आपण मिळून सर्वात आधी या जागतिक अविश्वासाला विश्वासात रुपांतरित करुयात.



'सबका विश्वास, सबका प्रयास'


ही सगळ्यांनी मिळून एकत्र चालायची वेळ आहे आणि यासाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास'चा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक बनू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेत उलथापालथ असेल, उत्तर-दक्षिण अशी विभागणी असेल, पूर्व-पश्चिमेती दूरी असेल, अन्न-इंधन आणि खतांची व्यवस्था असो, दहशवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य-ऊर्जा-पाणी सुरक्षा असेल वर्तमानासह येणाऱ्या पिढ्यांसाठी या आव्हानांना तोंड देण्याकरता आपल्याला ठोस उपायांकडं जावंच लागेल, असं मोदीजी म्हणाले.



अफ्रिकन युनियनचा जी-२० मध्ये समावेश


यावेळी मोदींनी जी-२० मधील देशांकडे अफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची सहमती आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारला. याला सर्वांनी संमती दिल्यानंतर मोदींनी आपल्याजवळील 'गॅवल' तीन वेळा वाजवून याला सर्वांची संमती असल्याचं जाहीर केलं. यानंतर संमेलनाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना जी-२० तील स्थायी सदस्य म्हणून स्थान ग्रहण करण्याचं निमंत्रण दिलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी