जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, अशा विनंतीचे पत्रही सरकारने दिले आहे. मात्र जरांगे-पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मागण्यांसदर्भत सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही, उद्या माझ्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार” असा इशारा जरांगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
सरकारच्या जीआरमधून वंशावळी शब्द वगळून त्याऐवजी सरसकट मराठा समाज टाकावा, या मागणीसाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार आहे. सरकारने कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला. त्यातील वंशावळी शब्दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, अशा विनंतीचे पत्र सरकारकडून देऊनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता मात्र अजून सरकारचा निरोप आलेला नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहोत. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव जाहीर करणार नाही. तज्ञ, वकील, शेतकरी असे २० आणि २१ लोक शिष्टमंडळात असतील. आमच्याकडून देखील चर्चेसाठी दार खुले आहे. उद्या दिवसभर मी सरकारची वाट पाहीन. सरकारसाठीच मी सलाईन घेतले. उद्या शेवटचा दिवस आहे. यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.
जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यावर यावर नक्की तोडगा काढू असे खोतकर म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी यावर चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे किंवा त्यांनी स्वतः यावे. त्या बैठकीत काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे खोतकर म्हणाले. तर खोतकर यांची मागणी स्वीकारून एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवणार आहे. मनोज जरांगे यांचे शिष्टमडळ मुंबईत सरकारशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात १६ ते १७ सदस्य असणार आहेत. ज्यात अभ्यासक, आंदोलक आणि शेतकऱ्यांचा समावेश असेल. हे शिष्टमंडळ मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याबाबत सरकारसोबत चर्चा करणार आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…