G-20 Summit: जो बायडेन आज येणार भारतात, व्हाईट हाऊसकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

नवी दिल्ली : अमेरिका भारतात होत असलेल्या जी-२० परिषद (G-20 summit) यशस्वी आयोजनासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. व्हाईट हाऊसने (white house) बुधवारी जागतिक शिखर परिषदेत 0भाग घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नवी दिल्लीला रवाना होण्याच्या पूर्वसंधेला ही माहिती दिली. भारत ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीत वार्षिक जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करत आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-२० नेतांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरूवारी नवी दिल्लीत जातील. शुक्रवारी राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि शनिवार तसेच रविवारी ते जी-२० शिखर परिषदेच्या अधिकृत सत्रात सहभागी होतील.



भारताच्या यजमानपदामध्ये शिखर परिषद यशस्वी व्हावी


व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव कॅरिन जीन पियरे यांनी आपल्या दैनिक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले, आम्ही या वर्षी जी-२० नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करतो आणि या वर्षी भारताच्या यजमानपदाखाली ही परिषद यशस्वी व्हावी यासाठी भारताला पूर्णपणे सहकार्य करू.


चीनने आपली भूमिका
याआधी अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की चीनने ते स्वत: ठरवावे की नवी दिल्लीतील जी-२० शिखर परिषदेत ते कोणती भूमिका निभावणार आहेत. जर या परिषदेत बीजिंग यांना यायचे आहे आणि बिघडवणारी भूमिका निभवायची आहे तर हा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी