Maratha samaj Andolan : निर्णयाचं स्वागत... फक्त 'तो' शब्द वगळा तरच उपोषण मागे घेणार!

मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी


जालना : दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात (Maratha Samaj andolan) बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी तातडीने अध्यादेश जारी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना त्वरित कुणबी दाखले दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले. या निर्णयावर आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी माझ्यासकट अनेकांकडे अशा नोंदी नसल्याचे सांगत आपली भूमिका मांडली.


मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या संदर्भात काल महत्त्वाच्या निर्णयावर सरकारने घोषणा केल्या. त्या घोषणेबद्दल माध्यमांतून किंवा इतर ठिकाणांहून माहिती मिळाली मात्र सरकारकडून अधिकृतरित्या प्रत आलेली नाही. सरकारच्या निर्णयानुसार ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आजपासून दिले जातील. आपल्या मराठा समाजाची मागणी अशी आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. या मूळ मागणीवर राज्यातला मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे.


पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्रं देण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे आणि ती एक महिन्याच्या आत अहवाल देणार आहे, त्यानंतर निर्णय जाहीर होईल. पण वंशावळीची नोंद असलेल्यांनाच प्रमाणपत्रं मिळणार असा उल्लेख करण्यात आला आहे. आमच्यापैकी अनेक जणांकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही. त्यामुळे केवळ 'वंशावळ' या शब्दात सुधारणा करा व सरसकट अख्ख्या समाजाला प्रमाणपत्रं द्या, ही आमची मागणी आहे. दरम्यान हा निर्णय येईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या