मुंबई : शाहरुख खानचा बहूप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. ‘पठाण’ नंतर ‘जवान’ हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटासाठी खुप उत्सूक आहेत.
‘जवान’चे अॅडव्हान्स बुकिंग १ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला की आत्तापर्यंत जवानची कोट्यवधी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. लोकांना पहिल्याच दिवशी जवान सिनेमा पहायचा आहे. त्यामुळे या चित्रपटाचे बुकिंग काही ठिकाणी फुल झाले आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची तिकीटे ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत विकली जात आहेत. देशातील बहुतांश मेट्रो शहरांमध्ये ‘जवान’ च्या तिकिटांच्या किमती खूप जास्त आहेत.
चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई या शहरात देखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत हजार रुपयांच्यावर आहे तर दुसरीकडे अनेक शहरांतील काही सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा तुम्ही फक्त ६० ते १०० रुपयांमध्ये पाहू शकणार आहात.
कोलकात्याच्या बारासात येथील लाली, पद्मा आणि बारापूर थिएटरमध्ये जवानचे तिकीट अवघ्या ६० रुपयांमध्ये देण्यात येत आहे. त्याचबरोबर बाल्कनीतील तिकिटे केवळ ८० रुपयांना विकली जात आहेत. बसुश्री चित्रपटगृहात जवानची तिकीटे १०० आणि १५० रुपयांना विकली जात आहे.
तर मुंबईत डोंगरी भागातील प्रिमियर गोल्ड सिनेमागृहातही जवानची तिकीट खुप कमी किमतीत विकली जात आहेत. स्टॉल सीट्ससाठी १०० रुपये आणि सर्कल सीट्सचे तिकिटे ११२ उपलब्ध आहेत.
तर चेन्नईतील एजीएस चित्रपटगृहात जवानचे तिकीट ६५ रुपयात आहे. तर दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये जवानच्या तिकीटाचे दर हे ७० ते ८० रुपयांना उपलब्ध आहे.
अरुण कुमार दिग्दर्शित “जवान” या बहुप्रतिक्षित बॉलीवूड अॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहरुख खान, सान्या मल्होत्रा, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत दुहेरी भूमिकेत आहेत.
जवानमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलचा तिचा उत्साह शेअर केला आहे. तिने स्वत:चा ‘जवान’ टी-शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. तिचा संदेश स्पष्ट आहे: चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि ती प्रेक्षकांना मनोरंजनाने भरलेल्या अॅक्शन-पॅक प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.
जवानचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर याची चर्चा आहे. चाहते चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि शाहरुख खानच्या वेधक दुहेरी भूमिकेबद्दल उत्कटतेने चर्चा करत आहेत. सान्या मल्होत्राच्या फोटोने जवानच्या बझमध्ये भर घातली आहे. जवान हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. सान्या मल्होत्राच्या अफलातून भूमिका असलेला जवान ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये पदार्पण करत असून चाहत्यांना अॅक्शन-पॅक्ड सिनेमॅटिक अनुभवाची उत्सुकता आहे.