Jalana Maratha Andolan : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी गावात

  163

काय निर्णय होणार?


जालना : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या (Jalana Maratha Andolan) प्रश्नावर काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळातून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या चर्चेला यश मिळाले नाही. यास्तव उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. दुपारी १२:३० वाजता हे मंडळ गावात दाखल होईल, अशी माहिती मिळत आहे.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati village) येथे गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनाचा प्रश्न फारच चिघळला आहे. काल राज्य सरकारने न्यायालयात टिकेल असं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे ठिकठिकाणी मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. तर आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या निर्णयानंतर पाणीही न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारला यावर लवकरात लवकर निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणार्‍या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. या घटनेचे राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे तर सरकार मात्र अडचणीत सापडले आहे. ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळातर्फे आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या