Schemes : उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना…

Share
  • अर्थसल्ला : महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट

मागील लेखात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमइजीपी), सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पत हमी योजना (सीजीटीएमएसइ), सूक्ष्म आणि लघू उद्योग समूह विकास कार्यक्रम (एमएसई-सीडीपी) योजना आणि आजच्या पारंपरिक उद्योगांच्या पुनर्जन्मासाठी निधीची योजना (एसएफयूआरटीआय) या विषयावर माहिती दिली होती, तर इतर योजनांची माहिती आजच्या लेखात देणार आहे.

उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रम (इएसडीपी) योजना…
योजनेची उद्दिष्ट हे नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे, विद्यमान एमएसएमईची क्षमता वाढवणे आणि देशात उद्योजकीय संस्कृती रुजवणे ही आहे. ह्याचे मुख्य फायदे पुढीलप्रमाणे आहेत, समाजातील विविध घटकांपर्यंत विकास, उपलब्धी, प्रेरणा आणि उद्योजकीय कौशल्याद्वारे उद्योजकतेचा पाया वाढवणे हा आहे. इच्छुक आणि विद्यमान उद्योजक यांना सदर योजनेची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे. http://dcmsme.gov.in/Enterprise&skillDevelopment.htm आणि http://msmedi.dcmsme.gov.in यावर उपलब्ध आहे. प्रशिक्षण संस्था सहाय्य (एटीआय) योजना… एमएसएमई मंत्रालय अंतर्गत कार्यरत संस्था, म्हणजे एनआय-एमएसएमई, केव्हीआयसी, कॉयर मंडळ, टूल रूम्स, एनएसआयसी आणि एमजीआयआरआय यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणसाठी भांडवली अनुदानाच्या स्वरूपात सहाय्य दिले जाते, ज्याचा उद्देश पायाभूत सुविधांचे निर्मिती आणि बळकटीकरण आणि उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांना पाठिंबा देणे आहे. राज्य सरकार/केंद्रशासीत प्रदेश यांच्या मालकीचे आणि नियंत्रण असलेले सद्याच्या राज्यस्तरीय ईडीआय यांना प्रशिक्षण पायाभूत सुविधांच्या निर्मिती किंवा बळकटीकरण / विस्तारासाठी सहाय्य प्रदान केले जाते. या मंत्रालयाच्या प्रशिक्षण संस्थांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरण / विस्तारासाठी सहाय्याची रक्कम प्रत्यक्ष रकमेपेक्षा जास्त नसते. राजयस्तरीय ईडीआयसाठी जास्तीत-जास्त सहाय्याचे प्रमाण प्रत्येक बाबतीत रु. ३.०० कोटीपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमासाठी विहित दरांनुसार सहाय्य पुरवण्यात येते. एमएसएमई मंत्रालयाच्या संस्था आणि विद्यमान राज्यस्तरीय ईडीआय या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्थाना त्यांचे अर्ज संचालक/ उपसचिव (ईडीआय), सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, उद्योग भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली -११००११ यांच्याकडे पाठवू शकतात.

कॉयर विकास योजना-छत्री योजना…
कॉयर विकास योजना (सीव्हीवाय) ही कॉयर मंडळामार्फत देशभरातील कॉयर उद्योगांच्या विकासासाठी राबविण्यात येणारी एक छत्री योजना आहे. योजनेची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. उत्पादनाच्या आर्थिक स्तरावर देशात उपलब्ध असलेल्या कच्चा मालाचा मुबलक वापर वाढवणे, कामगार, उद्योजक, निर्यातदार आणि इतर उद्योगधंद्यातील भागधारक यांचे उत्पन्न परतावा वाढवणे, देशातील आणि परदेशातील उत्पादनांच्या बाजारपेठेतील संभाव्यतेचा पूर्ण वापर आणि उद्योगाशी संबंधित कार्यात्मक सहाय्य सेवा देणे, तसेच सुधारीत उपकरण यंत्रसामग्री, प्रक्रिया आणि नवीन उत्पादने विकसित करणे हे आहेत. योजनांची तपशीलवार माहिती कॉयर मंडळाच्या http://coirboard.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

खरेदी आणि विपणन सहाय्य (पीएमएस) योजना…
या योजनेचा उद्देश नवीन बाजारपेठ प्रवेश उपक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. जसे, देशभरात आयोजित केलेल्या राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे / प्रदर्शन / एमएसएमई एक्स्पो इत्यादींमध्ये सहभाग घेणे आणि एमएसएमईना त्यांचे महत्त्व शिकवणे / पद्धती / विपणनमधील पॅकेजिंगची प्रक्रिया, नवीनतम पॅकेजिंग तंत्रज्ञान, आयात-निर्यात धोरण आणि प्रक्रिया, जीईएम पोर्टल, एमएसएमई कॉन्क्लेव्ह, आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय व्यापरातील नवीनतम विकास/ राष्ट्रीय व्यापार आणि इतर विषय/ बाजार प्रवेश विकासाशी संबंधित विषयांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शिक्षित करणे आहे. तपशीलवार माहितीसाठी, पीएमएस योजनेची मागिदशिक तत्त्वे पाहण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा.

http://dcmsme.gov.in/OM%20&%20PMS%20Scheme%20Guidelines.pdf

mahesh.malushte@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

37 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

1 hour ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago