Manoj Jarange : लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल; मनोज जरांगेंशी देवेंद्र फडणवीस यांचा फोनवरुन संवाद

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंदोलनकर्त्यांशी साधणार संवाद

मुंबई : जालना येथे मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा प्रश्न फारच चिघळला आहे. राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको, तर काही ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करुन निषेध दर्शवला जात आहे. यामुळे एसटीच्याही अनेक ठिकाणी फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी त्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आज जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

काल बुलढाणा येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे यावर तातडीने पावले उचलत ते आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर लवकरच मराठा आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असंही सरकारनं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, अजित पवार हे तीन दिवसांपासून कोणत्याही जाहीर सभेत सहभागी झालेले दिसले नाहीत. कालच्या कार्यक्रमातही आजारी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजितदादांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का, हा प्रश्न आहे.

मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी तीव्र

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही सरकारचं ऐकतोय, प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचंही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करतंय, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे…

11 seconds ago

Kolhapur News : कोल्हापूरच्या दूधगंगा नदीत दोघांचा बुडून मृत्यू!

पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…

2 mins ago

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…

7 mins ago

लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ‘संचारबंदी’

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…

33 mins ago

Heavy rain in Konkan : कोकणात मुसळधार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…

1 hour ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…

1 hour ago