ISRO Scientist passed away : अवघ्या भारताची धाकधूक वाढवणारा चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळीचा काऊंटडाऊनमागचा आवाज हरपला!

Share

इस्त्रो शास्त्रज्ञ वलरमथी यांचं निधन

चेन्नई : भारत (India) हा १.४ अब्ज लोकसंख्येचा देश आहे, तरीही काही लोकांचे आवाज लोकांच्या मनात अनंतकाळ कोरलेले आहेत. काही अभिनेते, अभिनेत्री, ख्यातनाम व्यक्तिमत्त्वं अशा अनेक लोकांचे आवाज आपल्या कायम लक्षात राहतात. अशातच भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिम जिने भारताचं नाव अख्ख्या जगात मोठं केलं, ज्याचा आनंद आपण दरवर्षी साजरा करणार आहोत अशा चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेतील प्रक्षेपणावेळी अत्यंत महत्त्वपूर्ण काऊंटडाऊनचं काम करणार्‍या शास्त्रज्ञाचा आवाज आपल्या का लक्षात राहणार नाही? प्रत्येत भारतीयाने अगदी कान देऊन तो आवाज ऐकला होता. प्रत्येकाचंच लक्ष तेव्हा प्रक्षेपणाकडे होतं आणि छातीत धडधड वाढली होती. पण हाच भारतीयांची धाकधूक वाढवणारा इस्रो रॉकेट प्रक्षेपण काउंटडाउनमागील प्रतिष्ठित आणि शक्तिशाली महिला आवाज अनंतकाळासाठी नाहीसा झाला आहे. या आवाजामागील इस्त्रोच्या शास्त्रज्ञ वलरमथी (ISRO scientist Valarmathi) यांचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

गेल्या काही दिवसांपासून वलरमथी यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी संध्याकाळी तमिळनाडू येथे चेन्नईतील अरियालुरमधील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. इस्रोच्या प्री-लाँच काउंटडाउन घोषणांना त्यांचा आवाज असायचा. १४ जुलै रोजी लॉन्च झालेल्या चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळी त्यांचा आवाज होता. ३० जुलै रोजी जेव्हा PSLV-C56 रॉकेटने ७ सिंगापूर उपग्रह प्रक्षेपित केला तेव्हा त्यांनी शेवटची घोषणा केली होती. सतीश धवन स्पेस सेंटरमधील रेंज ऑपरेशन्स प्रोग्राम ऑफिसचा एक भाग म्हणून त्या गेल्या सहा वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळ सर्व प्रक्षेपणांसाठी काउंटडाउन घोषणा करत होत्या.

वलरमथी यांच्या निधनाबद्दल इस्रोने दुखः व्यक्त केलं आहे. श्रीहरीकोट्टा येथे इस्रोच्या भविष्यातील मिशन्सच्या काऊंटडाऊनमागे वलरमथी मॅडम यांचा आवाज ऐकू येणार नाही, याबद्दल सोशल मीडियावर त्यांना मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…

14 mins ago

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

47 mins ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

1 hour ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

3 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

3 hours ago