बारामती : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. इतर पक्षांप्रमाणेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने (MNS) देखील बैठका, दौरे सुरू केले आहेत. मनसेचा सध्या बारामती दौरा (Baramati visit) सुरु आहे. दरम्यान मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे (Vasant More)बारामती दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे पाहत आहेत, याबाबत वसंत मोरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘नाही, मला तर यावर्षी खासदार व्हायचे आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली, तर यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेचा खासदार हा वसंत मोरे १०० टक्के असेल’.
मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मनसे सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवले. यातच आता वसंत मोरे यांना बारामती लोकसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी यावेळी दिली. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलायचे? हे राज ठाकरे ठरवतील. पण बारामती शहरात लवकरात लवकर आम्ही राज ठाकरेंना आणणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा पहिला मेळावा बारामती शहरात होईल, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…