Eknath Shinde : ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत

Share

बुलढाण्यातून मुख्यमंत्री विरोधकांवर भडकले

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही : मुख्यमंत्री

बुलढाणा : बुलढाणा येथे आज ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहिल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लडाखला व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आजारी असल्याने येऊ शकले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना विराम लावला. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जालना येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Andolan) झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दुःख व्यक्त केले. तसेच ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही’, असं आश्वासन त्यांनी दिलं.

आज कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत’, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. महाविकास आघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये अशोक चव्हाण होते त्यांनी तेव्हा काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक चव्हाणांना विचारला आहे. महाविकास आघाडीने एकदाही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

दोषींवर निलंबनाची कारवाई होणार

जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर गरज पडली तर न्यायालयात देखील जाण्याची आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

मराठा समाजाने कधीच कोणाला त्रास होऊ दिला नाही; पण तुम्ही…

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे लाखो संख्येने मोर्चे निघायचे. पण या मोर्चाचा कधी कुणाला त्रास झाला नाही. त्यांनी कधीच कुणाला त्रास होऊ दिला नाही. मराठा समाज हा फार संयमी आहे. मराठा समाजाच्या मुकमोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही.

३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं

जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं तेव्हा ३,५०० तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांची निवड झाली होती पण नियुक्ती पत्र आली नव्हती. त्यावेळी कारवाई होईल म्हणून सगळ्यांना पाठ फिरवली. पण मी तेव्हा म्हटलं की काहीही होऊ दे पण मी मागे हटणार नाही. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्या ३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

8 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

28 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago