Jalna Maratha Andolan : मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे

Share

छगन भुजबळांचा मराठा आंदोलकांना पाठिंबा

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Jalna Maratha Reservation Protest) करत आहेत. काल काही विघ्नसंतोषी लोकांनी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात हाणामारी झाली. अनेक पोलीस यात गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून उचलण्यात आलेल्या लाठीचार्ज व गोळीबाराच्या पावलामुळे राजकीय नेत्यांकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो!” छगन भुजबळ हे सध्या नाशिकमध्ये (Nashik) असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

33 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago