मुंबई: आशिया कप २०२३ची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानने (pakistan) विजयासह केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकी खेळीच्या जोरावर तसेच दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेल्या २१४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळवर जबरदस्त विजय मिळवला. नेपाळला पाकिस्तानने तब्बल २३८ धावांच्या फरकाने हरवले.
पाकिस्तानच्या या मोठ्या विजयानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आणि भारताविरुद्धच्या सामन्याबाबतही मोठे विधान केले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, आशिया कपच्या पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध २३८ धावांनी मोठ्या विजयाने शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्धच्या बहुप्रतिक्षित सामन्याआधी आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाकिस्तानने ग्रुप एमध्ये कमकुवत नेपाळला २३८ धावांच्या मोठ्या अंतराने हरवत आशिया कपमध्ये विजयी सुरूवात केली. पाकिस्तान आता भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी पल्लेकलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे.
बाबरने सामना संपल्यानंंतर म्हटले की, हासामना भारताविरुद्धच्या सामन्याआधीची चांगली तयारी होती. कारण यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला. आम्हाला प्रत्येक सामन्यात १०० टक्के द्यायचे आहेत.
पाकिस्तानने नेपाळविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद ३४३ धावांचा मोठा स्कोर केला. बाबर आझमने १३१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्सशी आहे.…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…